क्रीडा पुरस्कार प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:41 AM2021-01-19T04:41:06+5:302021-01-19T04:41:06+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा, या ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे व योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशातून जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारामध्ये वाशिम जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (१ पुरुष, १ महिला व १ दिव्यांग), १ गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार असे एकूण चार पुरस्कार देण्यात येणार आहेत. जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी विविध खेळांचा समावेश असून, इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावेत व १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव बंद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले.