पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी २३ जुलैपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:41+5:302021-07-17T04:30:41+5:30
सन २०२१-२०२२ खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील खरीप ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीकविमा योजनेत करण्यात ...
सन २०२१-२०२२ खरीप हंगामाकरिता जिल्ह्यातील खरीप ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीकविमा योजनेत करण्यात आला आहे. या योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर पिकास दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या पीक नुकसानीस संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. योजनेत सहभागी होण्याची मुदत २३ जुलै २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नजीकच्या सामूहिक सुविधा केंद्र (सीएससी) अथवा बँकेत जाऊन विमा हप्ता भरावा.
-------------
सेवा केंद्र रात्री १० पर्यंत राहणार सुरू
अधिकाधिक शेतकऱ्यांना पीकविमा भरता यावा म्हणून २३ जुलै पर्यंतच्या काळात सामूहिक सेवा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, बँक अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे.