वाशिम बाजार समिती प्रशासक मंडळास मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:00+5:302021-02-05T09:21:00+5:30
आदेशात नमूद आहे की, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाची मुदत ३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार होती. मात्र, ...
आदेशात नमूद आहे की, वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाची मुदत ३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार होती. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता, तसेच सध्या विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्यात अंमलबजावणी सुरू असून, सदरची परिस्थिती पाहता महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ कलम १५ अ (१) (ब) नुसार शासनास प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रशासक मंडळास ४ फेब्रुवारीपासून पुढील सहा महिने म्हणजेच ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेशात भोईर यांनी म्हटले आहे.
वाशिम बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळामध्ये मुख्य प्रशासक म्हणून रेखा सुरेश मापारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून, बेबीताई मते, महादेव सावके, संजय भांदुर्गे, रत्नाकर गंगावणे, वसंता हजारे, मोहन चौधरी, आशा मापारी, हुसेन जानीवाले, विठोबा काळबांडे, श्याम देवळे, जनार्दन भोयर, परशराम भोयर, महादेव सोळंके, जयंत हुरकट, गजानन भोने, संतोष उगले, अनिल गोटे, अशा १८ जणांचा प्रशासक मंडळात समावेश आहे.