वाशिम जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस
By admin | Published: June 5, 2017 02:18 AM2017-06-05T02:18:48+5:302017-06-05T02:18:48+5:30
जिल्हावासीयांना मान्सूनपूर्व पावसाने रविवारी दिलासा दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तीव्र स्वरूपातील उकाड्याने त्रस्त होत असलेल्या जिल्हावासीयांना मान्सूनपूर्व पावसाने रविवारी दिलासा दिला. तब्बल अर्धा ते पाउण तास कोसळलेल्या पावसामुळे वातावरणात काहीअंशी गारवा निर्माण झाला आहे.
रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी अडीच वाजेपासून रिसोड, मालेगाव, वाशिम, कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा तालुक्यात दमदार पाऊस कोसळला. हा पाऊस सव्वा तीन वाजेपर्यंत सुरू होता. पाऊस आणि वादळी वार्यामुळे शिरपूरजैन (ता.मालेगाव) येथे झाडे उन्मळून पडण्यासोबतच व्यायामशाळेचे छत क्षतिग्रस्त झाल्याचे वृत्त आहे.
शनिवार, ३ जून रोजी देखील काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. त्यात रिसोड ४ मिलीमीटर आणि मंगरूळपीर तालुक्यात १0 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना सुरुवात होईल, अशी शक्यता शेतकर्यांमधून वर्तविली जात आहे.