११ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया नेत्रशस्त्रक्रिया शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 07:56 PM2017-09-21T19:56:32+5:302017-09-21T19:56:32+5:30
वाशिम : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे बुधवारी नेत्रशस्त्रकिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ६२ रुग्णांची नेत्रतपासणी करुन ६ पुरुष व ५ महिला अशाच एकुण ११ रुग्णांची नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामध्ये १० रुग्णांवर आंतर भिंगावरोपन नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्यात व एका रुग्णांवर टेरीजियम करण्यात आली. सदरील शिबिरात वाशिम जिल्ह्यातील डही, किन्हीराजा, बाभुळगाव, तोरणाळा, मालगाव, बाभुळगाव, बोराळा, सावळद, तोरणाळा, केकतउमरा, कृष्णा या गावातील रुग्णांनी सदर शिबिराचा लाभ घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क

सदर शिबिरामध्ये नव्यानेच रुजु झालेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी रुग्ण भरती, रुग्ण तपासणी, नेत्रशस्त्रक्रिया स्वच्छता या सर्व प्रक्रियामध्ये लक्ष घालु शासाच्या नियमानुसार सर्व बाबींचे तंतोतंत पालन करण्याच्या सुचना नेत्रशय चिकित्सक, नेत्रचिकीत्सक, अधिकारी अधिपरिचारीका, व सर्व संबंधीतांस देऊन १४ सप्टेंबर रोजी नेत्रशस्त्रक्रिया गृहामध्ये सर्व शस्त्रक्रिया होईपर्यंत स्वत: उपस्थित राहुन नेत्रशस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्यात तसेच १५ सप्टेंबर २०१७ रोजी नेत्र वार्डात जावुन सर्व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या डोळ्याची व नजरेची खातरजमा करुन रुग्णांनाही योग्य त्या सुचना दिल्यात. सदर शस्त्रक्रिया करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील नेत्रशल्य चिकित्सक डॉ.बीरबल पवार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथील नेत्र शल्य चिकित्सक डॉ.एस.एस.चांडोळकर, नेत्रचिकित्सक अधिकारी के.यु.पवार, बाहेकर, सोनोने, ठाकरे, अधिपरिचारीका श्रीमती मिटकरी , ढगे, गणेश वायचाळ यांनी सहकार्य केले.