समुपदेशन पद्धतीने मिळणार शिक्षकांना पदस्थापना !

By admin | Published: July 16, 2017 08:21 PM2017-07-16T20:21:08+5:302017-07-16T20:21:08+5:30

आंतरजिल्हा बदली प्रकरण : जिल्ह्यातून १४८ शिक्षक रूजू

Facilitator to be posted in the counseling method! | समुपदेशन पद्धतीने मिळणार शिक्षकांना पदस्थापना !

समुपदेशन पद्धतीने मिळणार शिक्षकांना पदस्थापना !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने १७ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर सामावून घेतले जाणार आहे.
गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले. आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाने २४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारीत धोरण निश्चित केले. त्यानुसार इच्छूक शिक्षकांकडून संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविले होते. ही प्रक्रिया मे व जून महिन्यात पार पडली. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात एकूण २१३ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७४ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून गेले. २१३ पैकी १४८ शिक्षक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रूजू झाले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर पदस्थापना दिली जाणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्याच्या दृष्टिकोनातून १७ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात समुपदेशन पद्धतीने रिक्त जागांवर नियुक्ती दिली जाणार आहे.

 

Web Title: Facilitator to be posted in the counseling method!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.