‘फेक’ फेसबुक अकाउंट उघडून केली बदनामी !
By admin | Published: May 26, 2017 01:53 AM2017-05-26T01:53:50+5:302017-05-26T01:53:50+5:30
वाशिम : वाशिम शहरातील खाडे नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रदीप वसंतराव गाडेकर नामक युवकाचे सोशल मीडियावर खोटे फेसबुक अकाउंट उघडून त्यावर अश्लील मजकूर टाकून बदनामी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरातील खाडे नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रदीप वसंतराव गाडेकर नामक युवकाचे सोशल मीडियावर खोटे फेसबुक अकाउंट उघडून त्यावर अश्लील मजकूर टाकून बदनामी केली. याप्रकरणी ७०३८६६२०५५ क्रमांकाच्या मोबाईलधारकाविरुद्ध आय.टी. अॅक्ट प्रमाणे शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, प्रदीप गाडेकर (रा. खाडे नगर, सिव्हिल लाइन, वाशिम) यांच्या नावाने ७०३८६६२०५५ क्रमांकाच्या मोबाइलधारकाने खोटे फेसबुक अकाउंट उघडले. त्या अकाउंटवर संबंधित आरोपीने अश्लील चित्र, चित्रफित व मजकूर अपलोड करून गाडेकर यांची समाजात बदनामी केली.
अशा प्रकारच्या गाडेकर यांच्या फिर्यादीहून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंविचे कलम २९४, ५०७, आय.टी. अॅक्ट ६६ (सी) ६७ (ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला.