नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

By admin | Published: September 17, 2014 01:24 AM2014-09-17T01:24:16+5:302014-09-17T01:24:16+5:30

तिनही आरोपी बुलडाणा जिल्ह्यातील : डीबी पथकाचे यश

Fake gold soldier selling gold | नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

नकली सोने विकणारी टोळी जेरबंद

Next

वाशिम : दहा लाख रूपये किलो किंमतीने सोने देण्याची बतावणी करणार्‍या टोळीला गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी रंगेहात पकडले.
वाशिम शहरामध्ये असलेल्या शोले स्विट मार्टचे संचालक संतोष सत्यनारायण व्यास यांना आरोपी गुलचंद माणक्या पवार (जि. बुलडाणा) याने कमीभावात सोने विक्री करणार असल्याचे आमीष दाखविले होते. सोने खरेदीसाठी दहा लाख रूपये तयार ठेवण्यास सांगीतले होते. याप्रकाराचा संशय आल्याने व्यास यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बोलणी प्रमाणे नियोजित तारखेला आरोपीला ग्रामीण पोलिस स्टेशन समोर बोलविले. तिथे व्यास यांना सोने देत असताना पोलिसांनी छापा टाकुन आरोपींस अटक केली. त्यांच्या जवळील सोने नकली आढळूण आल्यांने सखाराम बाळाजी भोसले, गुलचंद पवार व विलास प्रकाश पवार या तिनही आरोपींना अटक करून विरूद्ध ४२0 व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.

Web Title: Fake gold soldier selling gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.