शहनिशा न करताच कोरोनाबाधित असल्याची पुरविली खोटी माहिती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:21 AM2020-07-25T11:21:49+5:302020-07-25T11:22:01+5:30
खोटी माहीती देणाऱ्याविरुध्द कारवाईची मागणी हीवरा लाहे ग्रामपंचातयचे सरंपच सागर ढेरे व ग्रामसेवक मनोज मोहाळे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : तालुक्यातील ग्राम हीवरा लाहे येथील पंचायत समिती माजी सभापती अशोक ढेरे हे कोरोनाबांधीत असल्याची माहीती कोणतीही शहनिशा न करता संपूर्ण गावात पसरून त्यांची खोटी बदनामी केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोनासंसर्ग असल्याची खोटी माहीती देणाऱ्याविरुध्द कारवाईची मागणी हीवरा लाहे ग्रामपंचातयचे सरंपच सागर ढेरे व ग्रामसेवक मनोज मोहाळे यांनी केली आहे.
सध्या देशात कोरोना आजाराने थैमान घातले असतांना सर्वत्र या आजाराची भीती आहे. मात्र आरोग्य विभागाकडून कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णाची सविस्तर माहीती धनज पोलीस विभागाला देण्यात आली. ही माहिती धनज पोलीस स्टेशनचे गोपनिय विभागातील पोलीस कर्मचारी शिवाजी ठवकर यांनी हीवरा लाहे येथील पोलीस पाटील देविदास कवरे यांना २४ जुलै रोजी दिली. त्यावरून त्यांनी कोणतीही शहानिशा न करता तसेच सरंपच ,तलाठी , ग्रामसेवक यांना कोणतीही माहीती न देता. गावातील त्वरीत दुकाने बंद करण्याच्या सुचना देउन गावात कोरोना बांधित असल्याची माहीती पोलीस पाटील यांनी पसरविली. यामुळे आमच्या कुटुंबाची बदनामी झाली. गावात भितीचे वातावरण निर्माण झाले. परीणामी आमच्या कुटुंबाला मनस्ताप सोसावा लागला. घरचा व्यक्ती सरपंच असतांना सुध्दा कोणत्याही प्रकारची कल्पना फोनव्दारे देण्यात आली नाही. त्यामुळे विनाकारण कोरोनाबाबत खोटी माहीती देणाºया पोलीस कर्मचारी ठवकर व पोलीस पाटील कवरे यांच्या विरूध्द कारवााई करावी अशी मागणी हीवरा लाहे ग्राम पंचायतचे सरंपच सागर ढेरे यांना जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. बदनामी होण्याच्या हेतूने हे केल्याचे म्हटले अशोक ढेरे यांनी धनज पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
कोरोना बांधित रूग्ण असल्याची माहीती आरोग्य विभागाने धनज पो.स्टे.च्या गोपनिय विभागाला दिली. मात्र या संदर्भात शहनिशा न करता कर्मचारी थेट अशोक ढेरे या व्यक्तीच्या गावी हिवरा लाहे येथे जावून माहीती दिली. मात्र तो व्यक्ती येथील नसुन कारंजा येथील असल्याची निष्पिन्न झाले.
-अनिल ठाकरे, ठाणेदार, धनज
कोणत्याही कर्मचाऱ्यांनी शहनिाशा केल्याशिवाय कोरोनाबाधित कुटुंबाकडे विनाकारण जावू नये. तसेच या संदर्भात चौकशी करून ठाणेदार यांनी दोषिंवर कारवाई करावी
- धीरज मांजरे
तहसीलदार, कारंजा
कोरोना रूग्ण असल्याची माहीती पसरविताना घाई कशाला, ग्रामीण भागात विनाकारण कोणाला बदनाम करण्याच्या हेतूने घाई केल्या जात असल्याचा प्रकार पुढे येत आहे. माझ्या नावाची बदनामी झाली असता मीे पोलीस स्टेशन धनज येथे तक्रार देण्यासाठी १२ वाजता गेलो असता तक्रार ३ वाजता घेण्यात आली. त्यावरून धनज पोलीस स्टेशनचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी तक्रारकर्त्यांना नाहकत्रास देत आहे असे वाटते.
- अशोक ढेरे
पंचायत समिती , माजी सभापती कारंजा