CoronaVirus : गावात ‘कोरोना’ची खोटी अफवा; भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 04:09 PM2020-03-14T16:09:16+5:302020-03-14T16:09:24+5:30
कोरोना संदर्भात गावात खोटी बातमी सोशल मिडीया गृपवर १३ मार्चपासून व्हायरल झाली आहे
वाशिम : रिसोड तालुक्यातील वाकद गावामध्ये ‘कोरोना’ सदृष्य रुग्ण असल्याची अफवा पसरविल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने तातडीने भेट देऊन पाहणी केली असता असा कोणताच प्रकार नसून अफवा पसरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलीस विभागाच्यावतिनेही अफवा पसरविणाºयाचा शोध घेण्यात येत आहे.
कोरोना संदर्भात गावात खोटी बातमी सोशल मिडीया गृपवर १३ मार्चपासून व्हायरल झाली आहे. ही अफवा पसरल्याबरोबर वाकद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतिने गावाची पाहणी करण्यात आली. वाकद गावात कोणताही कोरोना सदृश्य रुग्ण नसल्याचा दावा करुन खोट्या अफवेवर विश्वास ठेवू नये असे वाकद प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्ैद्यकीय अधिकारी संतोष पतंगे यांनी सांगितले . संपूर्ण गावाची पाहणी केली असता कोणताही सदृष्य रुग्ण गावात निदर्शनास आला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य विभागाच्या चमूने सुद्धा वाकद गावात भेट देऊन सदरहू सत्यता पडताळण्यासाठी पाहणी केली आहे. सदरहू ही खोटी बातमी एका न्यूज चॅनेलच्या नावावर बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.
‘कोरोना’ संदर्भात वाकद येथे पसरविण्यात आलेल्या अफवेच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतिने गावाची तपासणी करण्यात आली. हा कोणताच प्रकार गावात नाही.
- डॉ. संतोष पतंगे
वैद्यकीय अधिकारी, वाकद
सोशल मिडियावर ‘कोरोना’ संदर्भात अफवा पसरविणाºयाचा शोध पोलीस घेत आहे. तसेच सोशल मिडीयाव्दारे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- अनिल ठाकरे
ठाणेदार, रिसोड