शिरपूर आरोग्य केंद्रात दोन वर्षापासून कुटूंब शस्त्रक्रीया बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 02:29 PM2020-01-17T14:29:47+5:302020-01-17T14:29:53+5:30
शिरपूर जैन : जिल्हयात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करण्याचा मान मिळालेल्या शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गत दोन वर्षांपासून पूर्णता बंद आहेत.
- शंकर वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : जिल्हयात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रीया करण्याचा मान मिळालेल्या शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गत दोन वर्षांपासून पूर्णता बंद आहेत. नवीन इमारत बांधकाम होऊनही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात उदासीनता दिसून येत आहे . यामुळे शस्त्रक्रिया करून घेण्यास इच्छुक असणाऱ्या शेकडो महिलांच्या शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.
एप्रिल २०१८ मध्ये शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. तेव्हापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम चार महिन्यापूर्वीच पूर्ण झाले . आॅक्टोबर २०१९ मध्ये नवीन इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभारही सुरू झाला परंतु शस्त्रक्रीया शिबिर घेण्यात आले नाही.
वाशीम जिल्ह्यात सर्वाधिक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा मान बºयाच वेळा शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला यापूर्वी मिळालेला आहे. मात्र नवीन इमारतीत आरोग्य केंद्र सुरू होऊनही अद्यापही कुटुंबनियोजनाचा शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात घेता आले नाही. परिणामत: गावातील व प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत शेकडो महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. तीन कोटी रुपयाची टोलेजंग नवीन इमारत उभारूनही येथे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
४कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करावी म्हणून शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात मी बराच वेळा विचारणा केली. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत याविषयी माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली . एकाप्रकारे शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमाला बगल दिल्या जात असल्याची प्रतिक्रीया अनिता संदीप जाधव, शालू भागवत जाधव यांनी व्यक्त केली.
४ शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कित्येक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी नाही.त्यामुळे कोणीही रुग्णांवर उपचार करतो.परिचर व परिचारीकाचे काही पदे रिक्त आहेत.याचा रूग्णसेवेवर परिणाम होत आहे.
नवीन इमारतीमधील आॅपरेशन थिएटर चे निजंर्तुकीकरण करण्याचे काम बाकी आहे. हे काम लवकरात लवकर करण्यात येईल. त्यानंतर शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील.
-संतोष बोरसे
तालुका वैद्यकीय अधिकारी मालेगाव.