प्रसिद्ध धार्मिक स्थळे विकासापासून कोसोदूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 06:55 PM2017-10-11T18:55:46+5:302017-10-11T18:57:27+5:30
वाशिम: राज्य व देशपातळीवर नावलौकीक असलेली विविध धर्मियांची तिर्थस्थळे व पर्यटन स्थळे वाशिम जिल्ह्यात आहेत. मात्र, बंजारा समाजबांधवांच्या पोहरादेवीचा अपवाद वगळता इतर धार्मिक स्थळांच्या विकासासाठी आवश्यक असणाºया निधीची विशेष तरतूद शासनस्तरावरून अद्याप झालेली नाही. परिणामी, ही स्थळे विकासापासून कोसोदूर असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जैन समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेले शिरपूर जैन, ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेले श्री बालासाहेब संस्थान, मुस्लिम बांधवांचा ऐतिहासिक तºहाळा दर्गा, प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेले डव्हा संस्थान, विदर्भात प्रसिद्ध असलेले सखाराम बाबांचे संस्थान श्रीक्षेत्र लोणी हे वाशिम जिल्ह्यात वसले आहेत. याशिवाय वाशिम शहरातील पुरातन वेशी, तलाव प्राचीन वैभवाची साक्ष देतात़ सन १९९७ पूर्वी वाशिममध्ये काहीठिकाणी झालेल्या उत्खननात ऐतिहासिक, पौराणिक वास्तू आढळून आल्या होत्या. त्यानंतर मात्र निधीच्या तरतूदीअभावी पुढील उत्खननाची बत्ती गुल झाली, ती अद्याप ‘जैसे थे’ आहे. एकूणच या सर्व बाबींमुळे जिल्ह्याचा पर्यटकीयदृष्ट्या विकास रखडला असून शासनाने यासाठी भरीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.