आधीच ट्रॅव्हल्सची भाडेवाढ झाल्याने राखी पाेर्णिमेनिमित्त भाडेवाढ थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:32+5:302021-08-20T04:47:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : दरवर्षी सणानिमित्त ट्रॅव्हल्सची भाडेवाढ हाेतेय. राखी पौर्णिमेच्या ताेंडावरही ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीमध्ये वाढ अपेक्षित हाेती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दरवर्षी सणानिमित्त ट्रॅव्हल्सची भाडेवाढ हाेतेय. राखी पौर्णिमेच्या ताेंडावरही ट्रॅव्हल्सच्या भाडेवाढीमध्ये वाढ अपेक्षित हाेती. परंतु नुकतेच पेट्राेल, डिझेल दरवाढीमुळे ट्रॅव्हल्सची भाडेवाढ झाली नसल्याचे ट्रॅव्हल्सचालकाने सांगितले.
दरवर्षी दिवाळी, दसरा, पाेळा, राखी पौर्णिमेसह महत्त्वाच्या सणानिमित्त बाहेरगावी नाेकरी व इतर कामानिमित्त असलेले नागरिक आपल्या गावी परतताहेत. प्रवाशांची संख्या यावेळी माेठ्या प्रमाणात असल्याने ट्रॅव्हल्सची दरवर्षी भाडेवाढ हाेत असते. परंतु यावेळी पूर्वीच भाडेवाढ झाल्याने यावेळी भाडेवाढ झाली नाही.
ट्रॅव्हल्सची संख्या दुप्पट
कडक निर्बंधात वाशिम येथे यवतमाळ, पुसद येथून येणाऱ्या माेजक्याच ट्रॅव्हल्स हाेत्या. कडक निर्बंध हटल्याबराेबर यामध्ये माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कडक निर्बंधांमध्ये वाशिम शहरातून जवळपास १५ ट्रॅव्हल्स धावत हाेत्या. परंतु आता ट्रॅव्हल्स पूर्ववत झाल्या असून काही अपवाद ट्रॅव्हल्स वगळता सर्व ट्रॅव्हल्सच्या बसेस सुरू झाल्या आहेत. जवळपास ४० ट्रॅव्हल्स शहरातून दरराेज जातात.
...
सणानिमित्त प्रवाशांची संख्या माेठ्या प्रमाणात असल्याने बसेसही अपुऱ्या पडतात. यामुळे सणानिमित्त भाडेवाढ केली जात असायची. परंतु आधीच काेराेनाच्या संकटामुळे व्यवसाय डबघाईस आला हाेता. आता कुठे पूर्ववत हाेत आहे. त्यात पेट्राेल, डिझेल भाववाढीमुळे टॅव्हल्स भाडेवाढ झाली आहे. यामुळे राखी पौर्णिमेनिमित्त भाडेवाढ नाही.
- पप्पू चरखा, ट्रॅव्हल्सचालक, वाशिम