'पर्यावरण वाचवा'चा संदेश देणाऱ्या चिमुकलीचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 03:09 PM2018-05-24T15:09:42+5:302018-05-24T15:11:32+5:30
वाशिम : ‘बेटी बचाओ ,बेटी पढाओ ’ अभियानांतर्गत वृक्षसंवर्धन व पर्यावरण वाचवण्याचा आगळा वेगळा संदेश देणाऱ्या प्राची भोने या चिमुकलीचा सत्कार एस. एम. सी. इंग्लिश स्कूल , वाशीम येथे बुधवारी करण्यात आला.
वाशिम : ‘बेटी बचाओ ,बेटी पढाओ ’ अभियानांतर्गत वृक्षसंवर्धन व पर्यावरण वाचवण्याचा आगळा वेगळा संदेश देणाऱ्या प्राची भोने या चिमुकलीचा सत्कार एस. एम. सी. इंग्लिश स्कूल , वाशीम येथे बुधवारी करण्यात आला.
ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणाचा झपाट्याने ह्रास होत आहे .बदललेले ऋतुचक्र ,तापमानात झालेला बदल ,अवकाळी पाऊस,गारपीट ,पाणी टंचाईचे आसमानी सुलतानी संकट आणी हे जगावर घोंघावत असलेले नैसर्गिक संकट दुर करावयाचे असेल तर वृक्ष लागवड व त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनावर भर द्यावा लागणार आहे . ही महत्वाची बाब एस .एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीम येथे इयत्ता सहाव्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकलीने ओळखले.तिने पर्यावरण वाचण्याचा संदेश देण्याकरीता आगळा वेगळा छंद जोपासला .खेळण्या बागडण्याच्या वयात तीने तब्बल चारशे विविध वृक्षांच्या बिया गोळा करून वृक्षांची बेसुमार कत्तल करणार्यांन समोर नविन आदर्श निर्माण करून मुली सुद्धा आता कुठल्याही क्षेञात कमी नाही हे सिद्ध करून दाखविले.कु प्राची भोणे हिच्या ऊपक्रमाची दखल बेटी बचाओ -बेटी पढाओ चे संयोजक डॉ दीपक ढोके यांनी घेतली व त्यानिमित्त एस.एम.सी.इंग्लिश स्कूल,वाशीम येथे सत्काराचे आयोजन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एम.सी.शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाध्यक्ष प्रा.हरीभाऊ क्षीरसागर सर व प्राचार्य मीना ऊबगडे याची प्रमुख उपस्थिति लाभली होती .यावेळी मार्गदर्शन करणारे प्राचार्य मीना ऊबगडे व राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अभिजीत जोशी यांनी तर आभारप्रदर्शन शिक्षिका किरण देशमुख यांनी केले.