शेतकरी आंदोलनाची धग कायम !
By admin | Published: June 9, 2017 01:28 AM2017-06-09T01:28:38+5:302017-06-09T01:28:38+5:30
मालेगावात कडकडीत बंद; शिवसंग्रामचा रिसोड, वाशिम येथे चक्का जाम, आंदोलनात राजकीय पक्षांची उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकर्यांनी पुकारलेल्या संपाची धग जिल्हयात कमी-अधिक प्रमाणात अद्यापही कायम आहे. गुरुवारी मालेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला तर शिवसंग्रामने चक्का जाम आंदोलन केले. टणका, सोनगव्हाण येथील शेतकर्यांनीदेखील सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. दरम्यान, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीदेखील या आंदोलनाच्या सर्मथनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.
शेतकर्यांना सरसकट पीककर्ज माफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, शे तमालास उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात १ जूनपासून शेतकर्यांनी संप पुकारला. या संपात सहभागी होत वाशिम जिल्ह्यातील शेतकर्यांनीदेखील विविध टप्प्यात आंदोलने केली. १ ते ७ जून या दरम्यान राज्यव्यापी संपाची हाक होती. दरम्यान, ८ जून रोजीदेखील वाशिम जिल्ह्यात शेतकर्यांसह शिवसेना व शिवसंग्रामच्या पदाधिकार्यांनी आंदोलन करून शेतकरी संपाची धग जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात कायम असल्याचे दाखवून दिले.
शिवसंग्रामतर्फे चक्का जाम
वाशिम : शेतकर्यांचे पीककर्ज माफ करावे यासह विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम पक्षाच्या जिल्हा पदाधिकार्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, ८ जून रोजी वाशिम जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष विष्णूपंत भूतेकर यांच्या नेतृत्त्वात चक्का जाम आंदोलन केले. वाशिम येथील पोलीस स्टेशन चौकात आंदोलन झाल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती.
शेतकर्यांना ह्यअच्छे दिनह्णचे स्वप्न दाखविणार्या भाजपा सरकारने प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांचा स्व प्नभंग केला आहे, असा आरोप करीत शिवसंग्रामने वाशिम जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन केले. शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, शेतमालाला समाधानकारक हमीभाव मिळावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसंग्रामच्या पदाधिकार्यांनी गुरूवारी चक्का जाम आंदोलन केले.
मालेगाव शहर कडकडीत बंद
मालेगाव : शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून ८ जून रोजी मालेगाव शिवसेना शाखेच्यावतीने मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती. त्याला प्रतिसाद म्हणून सर्व स्तरातून पाठिंबा मिळाल्याने गुरूवारी बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. शेतकर्यांच्या न्यायोचित मागणीसाठी राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि बंद पुकारण्यात येत आहे. मालेगाव येथेसुद्धा शिवसेना कार्याध्यक्ष उद्वव ठाकरे, खासदार भावना गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर अध्यक्ष सं तोष जोशी यांच्या नेतृत्वात तालुका आणि शहर शाखेच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता.
संपूर्ण पीक कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला हमी भाव देण्यात यावा, शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे यासाठी हा बंद पुकारल्याचे जोशी यांनी सांगितले. सकाळी ८ वाजतापासून सर्व पदाधिकार्यांनी मालेगाव बंद ठेवण्यासाठी नागरिकांसह व्यापार्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद मिळाल्याने हा बंद १00 टकके यशस्वी झाला.
रिसोड येथे चक्का जाम आंदोलन
रिसोड : शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत भुतेकर व शिवसंग्रामचे रिसोड तालुका अध्यक्ष बाजीराव पाटील हरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंग्राम रिसोड तालुक्याच्यावतीने रिसोड येथील वाशिम नाका येथे गुरूवारी चक्का जाम आंदोलन केले.
टणका, सोनगव्हाण येथील शेतकर्यांनीदेखील सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला.
आज अनसिंग, माळेगाव, भटउमरा येथे शेतक-यांचा बंद
अनसिंग : सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यासह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी शे तकर्यांच्यावतीने ९ जुन रोजी अनसिंग बंदचे आवाहन करण्यात आले आहे. अनसिंग सर्कलच्या शिवसेना कार्यकर्त्यांसह अन्य पक्षाचे पदाधिकारी व शेतकर्यांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. बंदबाबत अनसिंग ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. वाशिम येथेदेखील विविध मागण्यांच्या पुर्त तेसाठी ९ जून रोजी शेतकर्यांचे आंदोलन असून, या आंदोलनाच्या सर्मथनार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आंदोलन केले जाणार आहे.