सोयाबिनवरील करपा रोगामुळे शेतकरी ‘चिंतातूर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 02:24 PM2018-08-28T14:24:17+5:302018-08-28T14:24:43+5:30

वाशिम : दरवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबिन पिकावर पाने खाणारी हिरवी उंटअळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होतो. यंदा मात्र या पिकावर करपा रोगाने हल्लाबोल केला असून शेंगा सुकून गळण्याचे प्रमाण वाढले आहे.

Farmer 'anxious' due to soyabean disease! | सोयाबिनवरील करपा रोगामुळे शेतकरी ‘चिंतातूर’!

सोयाबिनवरील करपा रोगामुळे शेतकरी ‘चिंतातूर’!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दरवर्षीच्या खरीप हंगामात सोयाबिन पिकावर पाने खाणारी हिरवी उंटअळी, शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होतो. यंदा मात्र या पिकावर करपा रोगाने हल्लाबोल केला असून शेंगा सुकून गळण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता उद्भवल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दरम्यान, करपा रोग नियंत्रणासंबंधी युद्धस्तरावर जनजागृती सुरू असून शेतकºयांनी खचून न जाता प्रभावी उपाययोजना कराव्या, असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून सोयाबिनचे पीक घेत असून आतापर्यंत कधीच सोयाबिनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झालेला नव्हता. दरम्यान, यावर्षी शेतकºयांनी सोयाबिनवर दोन ते तीन फवारण्या करून दरवर्षी उद्भवणाºया रोगराईपासून पिकाचे रक्षण केले. मात्र, सोयाबिनवरील करपा रोगावर नियंत्रण मिळविणे जवळपास अशक्य ठरत आहे. या रोगामुळे सोयाबिनच्या शेंगा सुकत असून हे प्रमाण सुमारे ८० टक्के आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त सोयाबिन क्षेत्राचे सर्वेक्षण करून तसा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवावा. तसेच पिक विमा कंपनीनेही नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करावी, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. 

Web Title: Farmer 'anxious' due to soyabean disease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.