कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 06:54 PM2021-05-24T18:54:53+5:302021-05-24T18:55:03+5:30
Farmer commits suicide : वसंता कनिराम जाधव यांच्याकडे शेती असून, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फुलउमरी या शाखेचे ८६ हजार रुपये कर्ज आहे.
मानोरा : तालुक्यातील फुलउमरी येथील शेतकरी वसंता कनिराम जाधव (वय ५५) यांनी कर्जाला कंटाळून शेतातील मोहाच्या झाडाला गळफास लाउंन आत्महत्या केल्याची घटना २५ मे रोजी उघडकीस आली.
फुलउमरी येथील वसंता कनिराम जाधव यांच्याकडे शेती असून, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा फुलउमरी या शाखेचे ८६ हजार रुपये कर्ज आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी याची चिंता त्यांना लागली होती. यावर्षी कोरोनाकाळात वसंता जाधव यांनी आपल्या मुलाचे लग्न साध्या पद्धतीने उरकविले. कोरोना काळात हाताला काम नाही व पुढे शेती कशी पेरावी या विवंचनेत असतानाच, त्यांनी भाउ सीताराम कनिराम जाधव यांचे शेतातील मोहाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत मृतकाचा मुलगा प्रवीण वसंता जाधव यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे व जमादार दिलीप जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. शोकाकुल वातावरनात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचे मागे पत्नी, दोन मूले व दोन मुली असा परिवार आहे.