सावकार पिडिताला ५ वर्षानंतर मिळाला न्याय; जमीन परत करण्याचा आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 06:43 PM2018-03-23T18:43:14+5:302018-03-23T18:43:14+5:30
वाकद (वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून सावकार पिडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप्त झाली.
वाकद (वाशिम) : येथील एका अवैध सावकार प्रकरणाचा पाच वर्षानंतर निकाल लागला असून सावकार पिडित आश्रू किसन बोडखे यांना सावकाराच्या ताब्यात असलेली जमीन परत करण्याचे आदेश सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी पारित केल्याची माहिती २३ मार्चला प्राप्त झाली.
वाकद येथील आश्रू बोेडखे यांची सर्व्हे नं. २९५ मध्ये ०.८५ हे.आर. जमीन आहे. तथापि, एकलासपूर येथील जगन गंगा भारती यांच्याकडून घेतलेल्या १ लाख ५६ हजार रुपये रकमेतून सदर जमिनीची खरेदी करून देण्यात आली होती. सदर रक्कम व्याजासह परत देण्यासाठी वाकद येथील सदाशिव सखाराम पोपळघट यांच्याकडून बोडखे यांनी सन २०११ मध्ये ४ टक्के व्याजदराने २ लाख १८ हजार रुपये घेतले. त्याबदल्यात सदर जमिनीची खरेदी जगन भारती यांच्याकडून वनमाला सदाशिव पोपळघट यांच्या नावे करण्यात आली. मात्र, त्यानंतरही सदर जमीन बोडखे यांच्याच ताब्यात होती. त्यानंतर त्यांचा मुलगा संतोष आश्रू बोडखे यांनी जमिन परत मिळण्यासाठी तक्रार अर्ज सादर केला.
सदर प्रकरणात विभागीय सहनिबंधक, अमरावती यांच्याकडे अपील करण्यात आले. तसेच उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथेही याचीका दाखल करण्यात आली. त्यावरून न्यायालयाने ९ सप्टेंबर २०१५ ला याचिका निकाली काढली व याबाबतची नोटीस जिल्हा उपनिबंधक कार्यालयास निर्गमीत करण्यात आली. त्यावरून सदर व्यवहार हा अवैध सावकारी स्वरुपाचा असल्याचे सिद्ध झाल्याने व सावकारी अधिनियम कलम १८ (२) अन्वये सदर खरेदी अवैध ठरली असून उपरोक्त मालमत्ता कर्जदार आश्रू किसन बोडखे यांना परत करण्याचे आदेश जिल्हा निबंधक यांनी दिले.