विहिंपची शेतकरी जागर यात्रा मालेगावात; गाय पालनाचे केले आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 02:35 PM2018-01-19T14:35:13+5:302018-01-19T14:37:32+5:30

मालेगाव: बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मालेगाव येथे शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Farmer Jagar Yatra visit to VHP Malegaon; Appeal to the cow's cows | विहिंपची शेतकरी जागर यात्रा मालेगावात; गाय पालनाचे केले आवाहन

विहिंपची शेतकरी जागर यात्रा मालेगावात; गाय पालनाचे केले आवाहन

Next
ठळक मुद्देबजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मालेगाव येथे शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली.विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालेगाव शहर यांच्या वतीने मालेगाव नगरीतील शिव चौकात राम मंदिरासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व गाय पालनाचे आवाहन केले.

मालेगाव:  गायीपासून मिळणाऱ्या विविध घटकांचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. ही बाब शेतकऱ्यांना  पटवून देण्यासह त्यांनी गाईचे पालन करावे आणि रसायनमूक्त शेती कशी करावी, या संदर्भात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्यावतीने मालेगाव येथे शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 या यात्रेची सुरुवात माँ जिजाऊ याचं जन्म स्थळ सिंदखेडराजा येथून झाली आहे. पांडुरंग फुंडकर यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात केली आहे.हि यात्रा सिंदखेडराजा पासून ते वर्धा पर्यंत असणार आहे. शेतकऱ्यांना  मार्गदर्शन व जागृत करण्याच काम या यात्रेद्वारे करण्यात आहेत. या यात्रेचे १८ जानेवारी रोजी सायंकाळी मालेगाव येथे आगमन झाले. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालेगाव शहर यांच्या वतीने मालेगाव नगरीतील शिव चौकात राम मंदिरासमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेची पूजन करून करण्यात आली. या ठिकाणी दिवाकरराव नरेकर, अ‍ॅड अमोल अंधारे, रवी धोपठ्ठवार यांनी  शेतकºयांना प्रमुख मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाला जिल्हा संघ चालक शंकर ढोबळे, पूर्व जिल्हा संघ चालक गोविंद पुरोहित, प्रांत उपाध्यक्ष विहिप गोविंद शेंडे, शेतकरी जागर यात्रा प्रमुख दिवाकररावजी नरेकर, बजरंग दल प्रांत संयोजक अमोल अंधारे, रामदास बळी, अमोल सोनुने, गोपाल पाटिल राऊत, बाला सावंत, आशिष बळी, सागर अहिर, नितिन काळे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. बजरंग ग्रुप, श्री राम ग्रुप, यांचे विशेष सहकार्य कार्क्रमाला होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार मांडे यांनी केले. आभार प्रदर्शन आशीष बळी यांनी केले.  

Web Title: Farmer Jagar Yatra visit to VHP Malegaon; Appeal to the cow's cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.