जीवंत विद्युत तार हातात घेऊन शेतकऱ्याने मारली नदीत उडी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:42 PM2020-08-30T18:42:56+5:302020-08-30T18:43:09+5:30
कारखेडा येथील शेतकºयाने हातात जीवंत विद्युत वायर घेऊन खोराडी नदीत ३० आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उडी घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : सततची नापिकी आणि कजार्ला कंटाळून मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील शेतकºयाने हातात जीवंत विद्युत वायर घेऊन खोराडी नदीत ३० आॅगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उडी घेतली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी मानोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. रोहिदास कोंडबा जाधव (५५) असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखेडा येथील शेतकरी रोहिदास कोंडबा जाधव यांची विठोली शेतशिवारात दोन एकर जमिन आहे. शेतामध्ये सोयाबीन व तूरीची पेरणी केली. परंतू सततच्या संततधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अपेक्षित सोयाबीन हाती येणार नसल्यामुळे कजार्ची परतफेड कशी करावी? याची चिंता त्यांना लागली होती. त्यांच्यावर आयसीआयसीआय बँॅकेचे १ लाख ८५ हजार रुपये कर्ज आहे. नापिकी आणि कजार्ला कंटाळून त्यांनी ३० आॅगस्ट रोजी शेतातील जीवंत विद्युत वायर घेऊन त्यांनी कारखेडा शेतशिवारात असलेल्या खोराडी नदीत उडी मारली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जगदीश रोहीदास जाधव यांनी मानोरा पोलीसात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास बिट जमादार गणेश जाधव करीत आहेत.