गव्हापेक्षा शेतकऱ्यांची हरभऱ्याला अधिक पसंती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 03:19 PM2019-12-07T15:19:37+5:302019-12-07T15:20:39+5:30
अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सप्टेंबर व आॅक्टोंबर महिन्यात सतत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे खरीप हंगामात आलेला तोटा रब्बी हंगामात भरून निघेल या आशेवर रब्बी हंगामात गव्हापेक्षा हरभऱ्याला शेतकऱ्यांची पसंती झालेल्या पेऱ्यावरुन दिसून येते. हरभरा पिकाला येत असलेला कमी खर्च व त्यातून मिळणारे अधिक उत्पादन तसेच सिंचनासाठी लागणारे कमी पाणी यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे.
जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात सरासरी क्षेत्राच्या ३० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना आजपर्यंत २४ हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी झाली असून, यात हरभरा पिकाचे प्रमाण १८ हजार हेक्टर, तर गहू पिकाचे प्रमाण ५ हजार ५०१ हेक्टर आहे. वाशिम जिल्ह्यात सरासरी ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी अपेक्षीत असताना कृषी विभागाने १ लाख ३० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात यंदा रब्बी पेरणीचे नियोजन केले होते.
तथापि, अवकाळी पावसाने आॅक्टोबरच्या मध्यंतरापासूनच थैमान घातल्याने रब्बी पिकांची पेरणी खोळंबली. त्यामुळे गळीत पिकांच्या क्षेत्रावर परिणाम झाला, तर तृण पिकांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात घटत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, हरभरा आणि गहू पिकाचे क्षेत्र यंदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६२ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रात हरभरा पिकाची पेरणी होते. सद्यस्थितीत १८ हजार हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. गहू पिकाचे क्षेत्र २८ हजार ४१७ हेक्टर अपेक्षीत असताना सद्यस्थितीत ५ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाल्याच्या कृषी विभागाच्या अहवालावरुन शेतकºयांनी गव्हापेक्षा हरभऱ्या पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
कारंजा तालुक्यात १७४८ हेक्टरवर होणार रब्बीची पेरणी
कारंजा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, सन २०१९-२० या वर्षांत कारंजा तालुक्यात १ हजार ७४८ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. शिवाय यंदाच्या पावसाळ्यात भरपूर पाउुस झाल्याने उपलब्ध जलस्त्रोतात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. या पाणीसाठ्याचा वापर सिंचनासाठी करून रब्बी पेºयात वाढ करावी असा मानस शेतकºयांकडून व्यक्त केल्या जात आहे. तालुक्यात आतापर्यंत झालेल्या पेरणी अहवालावरुन हरभºयाच्या क्षेत्रात वाढ होण्याची तर गव्हाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या रब्बी हंगामात कांरजा तालुक्यात सर्वाधिक १ हजार २३५ हेक्टरवर हरभरा त्यापाठोपाठ ४७० हेक्टरवर गहू तर १२ हेक्टरवर करडई आणि ३१ हेक्टरवर रब्बी हंगामातील इतर पिके पेरल्या जाण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केल्या जात आहे.