वीज जोडणीसाठी शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:47+5:302021-03-27T04:42:47+5:30
तक्रारीत नमूद आहे की,मी शेती करुन उदरनिर्वाह करतो . माझ्याजवळ चार एकर ओलिताची जमीन असुन माझे शेतामध्ये विहीर व ...
तक्रारीत नमूद आहे की,मी शेती करुन उदरनिर्वाह करतो . माझ्याजवळ चार एकर ओलिताची जमीन असुन माझे शेतामध्ये विहीर व बोअर आहे.त्यावर मोटरपंप बसविण्याकरीता विदयुत पुरवठा जोडणीसाठी अभियंता ,वीज वितरण कंपनी मंगरुळपीर यांचे कडे दिनांक ६ जानेवारी २०१४ रोजी अर्ज देऊन कोटेशन भरलेले होते . त्या करीता ५२५० रुपये देऊन पावती सुध्दा घेतलेली होती . त्यानंतर मागील ६ वर्षापासुन ते आजपावेतो माझ्या शेतामध्ये विदयुत पुरवठा जोडणी करण्यात आलेली नाही . त्याबाबत मी स्वत : अभियंता महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी मर्या . विभाग मंगरुळपीर यांचेकडे विदयुत पुरवठा जोडणीकरिता वारंवार गेलो असता त्यांनी सांगीतले की , तुमचे शेतामध्ये विदयुत पुरवठा जोडणी केल्याचे सांगत आहेत. शेतामध्ये कोणत्याही प्रकारची विदयुत पुरवठा जोडणी केलेली नाही . शेतामध्ये विदयुत पुरवठा नसल्यामुळे माझे फार मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.जर माझ्या शेतामध्ये वीज जोडणी झाली नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.तरी माझ्या शेतामध्ये विदयुत पुरवठा करुन देण्यात यावा व संबंधित अधिकारी कर्मचारी यांचेवर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.