सायखेडा येथे शेतकरी विधी सहाय्य अभियान उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 04:04 PM2018-11-16T16:04:49+5:302018-11-16T16:05:01+5:30

मंगरुळपीर (वाशिम): जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळ जिल्हा व सत्र न्यायालय वाशिमच्या वतीने वाशिम तालुक्यातील सायखेडा येथे तारीख १६ नोव्हेंबर रोजी शेतक-यांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबतीत योजना व तरतुदी संदर्भात मार्गदर्शन करण्याबाबत एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. 

Farmer Ritual Assistance Campaign at Sakhekhada | सायखेडा येथे शेतकरी विधी सहाय्य अभियान उत्साहात

सायखेडा येथे शेतकरी विधी सहाय्य अभियान उत्साहात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर (वाशिम): जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ मंडळ जिल्हा व सत्र न्यायालय वाशिमच्या वतीने वाशिम तालुक्यातील सायखेडा येथे तारीख १६ नोव्हेंबर रोजी शेतक-यांच्या समस्या जाणून घेऊन त्याबाबतीत योजना व तरतुदी संदर्भात मार्गदर्शन करण्याबाबत एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड अजयकुमार बेरिया, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. प्रसाद ढवळे, सचिव जिल्हा विधिज्ञ मंडळ, अ‍ॅड. अमर रेशवाल उपाध्यक्ष जिल्हा विधिज्ञ मंडळ,डॉ. मंगेश भाग्यवंत जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम, कृषी अधिकारी सुभाष ऊलेमाले, कृषी सहाय्यक प्रविण ऊलेमाले, कृषी सहाय्यक एम. डी. तायडे, सुनील पाटील, राजीव दारोकार, निलेश भोजणे, राहुल कसादे, सोपान अंभोरे, गंगवाल आदींनी मनोगत व्यक्त केले. तर नागार्जुन बौद्ध अल्पसंख्यांक बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शेतकरी आत्महत्या न करता खंबीरपणे उभे राहुन परिस्थितीचा मुकाबला करून आत्मनिर्भर जिवन जगता येईल, अशी परिस्थिती निर्माण करतो यावर लघु नाटिका सादर केली. या नाटिकेत शेतकºयाची भुमिका शाहिर जनार्दन भालेराव व शाहिर दतराव वानखेडे यांनी केली तर सुभाष सावळे पेटीवादक, सुनील सावळे, ढोलकपटू, गायक विनोद सावळे, गायक धम्मदिप सरकटे, गायिका कुसुम सोनुने,तर प्रेरक म्हणूनी पी. एस. खंदारे यांनी भुमिका साकारल्या.  सुत्रसंचालन पी. एस. खंदारे यांनी तर आभार न्यायालयीन कर्मचारी संजय जगताप यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य शेतकरी महिला पुरूषांची उपस्थिती होती.

Web Title: Farmer Ritual Assistance Campaign at Sakhekhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.