शेतकरी ते ग्राहक झेंडू फुलांची विक्री!

By admin | Published: October 24, 2016 02:28 AM2016-10-24T02:28:24+5:302016-10-24T02:28:24+5:30

सुविदे फाउंडेशन; दिवाळीच्या दिवशी घरपोच सेवा.

Farmer sells marigold flowers to the customer! | शेतकरी ते ग्राहक झेंडू फुलांची विक्री!

शेतकरी ते ग्राहक झेंडू फुलांची विक्री!

Next

नंदकिशोर नारे
वाशिम, दि. २३- दसर्‍यादरम्यान अचानक आवक वाढल्याने शेतकर्‍यांनी झेंडूची फुले फेकून दिली, हीच परिस्थिती दिवाळीत येऊ नये, याकरिता सुविदे फाउंडेशनअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र करडा, रिसोड कृषी समृद्धी प्रकल्प यांच्या मदतीने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री उपक्रम राबविला आहे.
फूल उत्पादक शेतकर्‍यांनी मोठी स्वप्ने उराशी बाळगून झेंडूंची बाग फुलविली; मात्र त्यास दसर्‍यादरम्यान अपेक्षित प्रतिसाद लाभला नाही. हे लक्षात घेऊन शेतकरी ते ग्राहक झेंडू फुलांची विक्री, या उपक्रमांतर्गत दिवाळीच्या आदल्या दिवशी घरपोच ताजी फुले, सोबत आंब्याची पाने मोफत देणार आहे. फुलांचे दर ५0 रुपये किलोप्रमाणे ठेवले आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी घरोघरी जाऊन ह्यऑर्डरह्ण घेत आहेत. शेतकर्‍यांना मदत म्हणून नागरिकांचा प्रतिसाद लाभत आहे.

Web Title: Farmer sells marigold flowers to the customer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.