विहिरीच्या पाण्यावर फुलविली कपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 06:37 PM2019-06-19T18:37:00+5:302019-06-19T18:37:06+5:30

इंझोरी येथील भिकुलाल चांडक या शेतकºयाने मात्र चक्क चार एकर क्षेत्रावर मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी केली आहे.

Farmer sowing pre-monsoon cotton | विहिरीच्या पाण्यावर फुलविली कपाशी

विहिरीच्या पाण्यावर फुलविली कपाशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): मान्सून लांबल्यामुळे जिल्हाभरात खरिपाची पेरणी खोळंबली असताना आणि कपाशीच्या पेरणीकडे शेतकºयांनी पाठ फिरविली असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील भिकुलाल चांडक या शेतकºयाने मात्र चक्क चार एकर क्षेत्रावर मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी केली आहे. शेतातील विहिरीच्या पाण्याने ते ही कपाशी फुलवित आहेत. 
जून महिना अर्धा अधिक उलटला असतानाही मान्सूनच्या पावसाचा थेंबही जिल्ह्यात पडलेला नाही. राज्यभरातील शेतकºयांत त्यामुळेच चिंतेचे वातावरण असून, खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. अद्याप कोठेही कोरडवाहू किंवा ओलिताच्या क्षेत्रातही खरीप पेरणी करण्याची जोखीम शेतकºयांनी पत्करलेली नाही. जिल्हाभरातील शिवारात केवळ काळ्या मातीशिवाय काहीच दिसत नाही. त्यातच भुजल पातळी घटल्याने शेतकºयांनी मान्सून पूर्व कपाशीची पेरणी केली नसून, आता कपाशीच्या पेरणीचा वेळही निघून गेला आहे. तथापि, मानोरा तालुक्यातील इंझोरीचे शेतकरी भिकुलाल चांडक याला अपवाद ठरले आहेत. त्यांच्या शेतातील विहिरीला बºयापैकी पाणी असल्याने त्यांनी आपल्या एकूण शेतजमिनीपैकी चार एकर क्षेत्रावर मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आहे. योग्य पद्धतीने पाणी देण्याच्या पद्धतीमुळे ही कपाशी चांगली बहरत असून, वितभर वाढली आहे.
 
सरी पद्धतीने पिकाला पाणी 
भिकुलाल चांडक यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करताना हा प्रयोग अंगलट येऊन नुकसान होऊ नये, याची पूर्ण काळजी घेतली आहे. कपाशीची लागवड करताना त्यांनी सºया पाडल्या असून, कपाशीला पाण्याचा नेमका फायदा होईल यासाठी ते सरी पद्धतीनेच पाणी देत आहेत. विशेष म्हणजे ही लागवड करताना त्यांनी चार एकर क्षेत्र पाण्याने योग्यरित्या भिजवून जमिन ओली केली आणि लागवडी योग्य झाल्यावरच कपाशीची लागवडही केली आहे. त्यामुळेच त्यांचा प्रयोग सध्या तरी, यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Farmer sowing pre-monsoon cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.