कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 05:34 PM2018-03-28T17:34:25+5:302018-03-28T17:34:25+5:30
शिरपूर जैन : कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन ता. रिसोड येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. शरद सदाशिवराव वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
शिरपूर जैन : कर्ज व नापिकीला कंटाळून गोवर्धन ता. रिसोड येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. शरद सदाशिवराव वाघ असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
गोवर्धन येथील शरद वाघ यांच्याकडे २.१३ हेक्टर जमिन आहे. त्यांच्याकडे स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा मसलापेनचे ८५००० हजार रुपयांचे कर्ज होते. आणखी एका बँकेचे कर्ज असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. २०१७-१८ या वर्षात अल्प प्रमाणात पाऊस झाला. पावसात सातत्य नसल्याने शेतीतून अपेक्षीत उत्पादन हाती आले नाही. त्यानंतरही नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातही अपेक्षीत उत्पादन घेता आले नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या विचाराने त्यांना ग्रासले होते. यातूनच शरद वाघ यांनी स्वत:च्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी गजानन भिकाराव वाघ यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मुपडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी हिरासिंग जाधव करीत आहेत.