साखरडोहच्या शेतकऱ्याने शेडनेटमध्ये फुलविली काकडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 06:09 PM2019-03-16T18:09:22+5:302019-03-16T18:09:26+5:30
वाशिम: कमीतकमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न साखरडोह येथील शेतकरी महादेव भगत करीत आहेत. याच प्रयत्नातून त्यांनी यंदा शेडनेटमध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक फुलविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: कमीतकमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न साखरडोह येथील शेतकरी महादेव भगत करीत आहेत. याच प्रयत्नातून त्यांनी यंदा शेडनेटमध्ये अवघ्या १० गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक फुलविले आहे.
साखरडोह येथील प्रगतशील शेतकरी महादेव भगत यांचा प्रमुख व्यवसाय शेतीच असून, वडिलोपार्जित शेतीत ते आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांचे भरघोस उत्पादन घेत आहेत. तूर, सोयाबीनसह इतर पारंपरिक पिके घेतानाच त्यांचा भाजीपालावर्गीय पिकांवरही चांगला भर आहे. यासाठी त्यांनी कृषी योजनेंतर्गत शेतात शेडनेट उभारले असून, या शेडनेटमध्ये ते गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळी भाजीपाला पिके घेत आहेत. मल्चिंग पद्धतीच्या आधारे ढोबळी मिरची लागवड करून त्यांनी गतवर्षी लाखोंचे उत्पादन घेतले. आता यंदा त्यांनी याच शेडनेटमध्ये महिनाभरापूर्वी अवघ्या १० गुंठे क्षेत्रात काकडीची लागवड केली आहे. खताचा योग्य वापर आणि नियोजनामुळे काकडीचे हे पीक चांगलेच बहरले असल्याने इतर शेतकºयांचे लक्ष वेधून घेत आहे. कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या मार्गदर्शनात त्यांनी हा प्रयोग केला असून, काकडीच्या पिकातूनही मोठे उत्पन्न मिळविण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.