विहिरीच्या अनुदानासाठी शेतकरी महिलेचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:59 PM2018-11-30T14:59:12+5:302018-11-30T15:00:05+5:30
महिला शेतकरी लाभार्थी प्रभाबाई धर्मा गवई या संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारून थकल्या असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन विहिरीचे अनुदानाची मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: तालुक्यातील डोंगरकिन्ही येथील शेतकरी लाभार्थ्यांने सिंचन विहिरीचे खोदकाम व बांधकाम करुन सहा महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप बांधकामाचे पैसे मिळाले नाही. विहिर बांधकामाच्या अनुदानासाठी महिला शेतकरी लाभार्थी प्रभाबाई धर्मा गवई या संबंधित विभागाकडे वारंवार चकरा मारून थकल्या असून, याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांकडे निवेदन देऊन विहिरीचे अनुदानाची मागणी केली आहे. याची दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे.
जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री राठोड यांना दिलेल्या निवेदनानुसार प्रभाबाई धर्मा गवई यांना पालकमंत्री सिंचन विहिर अंतर्गत रोजगार हमी योजनेतून विहिर मंजूर झाली होती. त्यांनी उसनवारी पैसे घेऊन विहिरीचे खोदकाम केले; परंतु सबंधित अधिकाºयांच्या हलगर्जीमुळे खोदकाम अनुदान दुसºयाच खात्यात जमा झाले. पावसाळ्यात विहीर खचू नये यासाठी सबंधित अधिकाºयांनी सांगितल्यानुसार सदर लाभार्थी शेतकरी महिलेने विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. विहिरीचे बांधकाम २७ जून २०१८ रोजी पूर्ण केले. त्यानंतर रोजगार सेवक यांनी तांत्रिक अधिकारी राठोड यांनी मोजमाप घेत एमपी करुन आॅनलाईन केली. रोहयो उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता शासनाने निधी पाठविला नाही. निधी आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जातील, असे सांगितले. दोन वेळा निधी येऊनही विहिरीचे अनुदान मिळाले नाही. येत्या ७ दिवसांत विहिरीचे अनुदान न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी लाभार्थी महिला प्रभाबाई धर्मा गवई यांनी दिला आहे.