मानोरा येथे तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:08 PM2018-05-23T17:08:15+5:302018-05-23T17:08:15+5:30
मानोरा : तालुक्यातील शेतकऱ्यांची तुर घेणे बंद झाल्याने हतबल झालेला शेतकरी वर्गासमोर बि- बियाणे व पेरणीचा गंभीर प्रश्न उभा झाला आहे.
मानोरा : तालुक्यातील शेतकऱ्यांची तुर घेणे बंद झाल्याने हतबल झालेला शेतकरी वर्गासमोर बि- बियाणे व पेरणीचा गंभीर प्रश्न उभा झाला आहे. घरात तुर पडुन असुन शासन घेण्यास तयार नाही. सावकाराजवळ जावे तर बेभाव किंमतीने तुरीची मागणी करत आहेत. शेतकºयांच्या या गंभीर विषयावर शिवसेनेच्यावतीने वारंवार निवेदन पत्रे, विनंती करुनही कुंभकर्णी झोपलेले खरेदी विक्री संघ, तहसील प्रशासन व दुय्यम निबंधकांना जागे करुन शेतकºयांची तुर नाफेड व्दारे पुर्ववत सुुरु करुन अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तुर खरेदीसाठी मानोरा शहरातील दिग्रस चौकात २३ मे रोजी दुपारी १२ वाजता शिवसेनेचे उपतालुका प्रमुख युवराज विजय जाधव , शहर प्रमुख मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या आयोजनात शेकडो शेतकरी बांधवांनी उस्थित राहायचे असे आवाहन आयोजक शिवसेना तालुका सचिव ओम बलोदे, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव यांनी केले होते. यावेळी पोलिस प्रशासनानी चोख बंदोबस्त ठेवला होता. तब्बल दिड तास चालेल्या आंदोलनात तहसील प्रशासनाने प्रतिनिधी, सहाय्यक दुय्यम निबंधक यांनी आंदोलकांशी चर्चा करुन निवेदन स्वीकारले. या बाबत १९ मे रोजी शिवसेनेच्यावतीने स्थानिक तहसील प्रशासन व पोलिस प्रशासन दुय्यम निबंधक व खरेदी विक्री संघाला निवेदन देवुन नाफेडची तुर खरेदी सुरु करण्याची मागणी केली होती. पंरतु शिवसेनेच्या मागणीची दखल न घेण्यात आल्याने शेतकºयांना भेडसावणाºया अतिशय ज्वलंत प्रशासन आज वाचा फोडण्याचे काम शिवसेनेचे उपतालुका प्रमुख युवराज विजय जाधव ता.सचिव ओम बलोदे, शहर प्रमुख मनोज राठोड, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव यांनी केले . मागील सतत तीन वर्षापासुन पडणाºया दुष्काळामुळे सावकार दारात येवु दे ना व बँक थकीत कर्जापायी कर्ज पुरवठा करण्यात असमर्थता दर्शविल्यामुळे आमची तुर घ्या असा टाहो आंदोलनादरम्यान शेतकरी वर्गांनी फोडला. दिलेल्या निवेदनानुसार चार दिवसात नाफेडची तुर खरेदी पुर्ववत सुरु करण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकºयांची तुर खरेदी करण्याची हमी देवनु न्याय न दिल्यास आता तीव्र स्वरुपाचे आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीने छेडु असा गंभीर इशारा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख युवराज विजय नाईक यांनी केले.
आंदोलनात मा.शहर प्रमुख मनोहर राठोड सचिव ओम बलोदे, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव, ब्रम्हा जाधव, रोहीदास राठोड, रमेश चव्हाण, वसंता राठोड, भरोस राठोड, अंबादास राठोड, रमेश भोयर, विष्णु चव्हाण आदि शेतकºयांनी केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच शेतकºयांनी सुध्दा स्वयंस्फुर्तीने या आंदोलनात सहभाग नोंदविला होता.