शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Published: October 9, 2016 01:39 AM2016-10-09T01:39:48+5:302016-10-09T01:39:48+5:30

सुक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी मालेगाव तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यांंच्या कार्यालयात वा-या.

Farmers are denied subsidy | शेतकरी अनुदानापासून वंचित

शेतकरी अनुदानापासून वंचित

Next

वाशिम, दि. 0८- राष्ट्रीय सूक्ष्म अभियानाअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा उपयोग करणार्‍या हजारो शेतकर्‍यांवर अनुदानासाठी तिष्ठत बसण्याची वेळ आली असून, मालेगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार ५0 शेतकरी मागील अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाचा घोळ सुटला नसल्याने त्याचा परिणामही सिंचन व्यवस्थापनावर होऊ लागला आहे.
एकिकडे सरकारने सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारलेले असताना ज्या शेतकर्‍यांनी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे दुर्लक्ष चालवले आहे. यातून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. राज्यात राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबवण्यात येत आहे. २0१३-१४ पयर्ंत या अभियानाअंतर्गत आणि २0१४-१५ मध्ये शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानाअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाचे प्रमाण ८0:२0 असे होते. २0१५-१६ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन) राबवण्याचे निश्‍चित केले आणि अनुदानाचे प्रमाण ५0:५0 असेल, असे कळवले. ठिबक सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली, पण निधी अपुरा पडल्याने अजूनही हजारो शेतकर्‍यांना ते मिळालेले नाही. कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजना शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आली. दरम्यान, या योजनेच्या स्वरुपात थोडा बदल करताना शासनाने अवर्षणप्रवण आणि अवर्षणाबाहेरील जिल्ह्यासाठी अनुदानाच्या टक्केवारीत बदल केला आणि अवर्षणप्रवण जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना या योजनेसाठी ६0 टक्के अनुदान, तर अवर्षणाबाहेरील जिल्ह्यांसाठी ४५ टक्के अनुदान निश्‍चित करण्यात आले. यासाठी सन २0१६-१७ या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार लाभार्थीची निवड होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी सन २0१४-१५ आणि २0१५-१६ या वर्षांंसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अट नसताना आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्यानुसार लाभार्थीची निवड करण्याचे स्पष्ट निर्देश नसतानाच मालेगाव तालुक्यातील चार हजारांवर शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत अर्ज करून आणि प्रसंगी कर्ज काढून ठिबक व तुषार संच बसवले. आज ना उद्या अनुदान मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी ठिबक व तुषार सिंचनासाठी एकरी ४५ ते ५0 हजार रुपयांपयर्ंत खर्च केला. यासाठी शेतकर्‍यांनी सावकार आणि बँकांचे उंबरठे झिजवले, पण अजूनही मालेगाव तालुक्यातील २0१४-१५ मधील एक हजार, तर २0१५-१६ मधील एक हजार ५0 शेतकर्‍यांना अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकर्‍यांकडून मागणी झाल्यास त्यांना तात्काळ ही सुविधा देण्याच्याही सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र त्या कागदावरच राहत आहेत.

सुक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना प्राप्त निधीतून अनुदानाचे वाटप केले आहे. मागील दोन वर्षांंत या योजनेसाठी अर्ज करणारे हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. हे वास्तव आहे; परंतु शासनाकडून निधीच मिळत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही.
-संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी, मानोरा

Web Title: Farmers are denied subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.