बियाणे, खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:06+5:302021-06-19T04:27:06+5:30

यंदा बऱ्याच कृषी सेवा केंद्र चालकांनी कंपनीचे सोयाबीन बियाणे विक्रीसाठी आणले नाही. त्यात यंदा बाजारात सोयाबीनचे दर साडेसात हजारांवर ...

Farmers are facing difficulties due to shortage of seeds and fertilizers | बियाणे, खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत

बियाणे, खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत

googlenewsNext

यंदा बऱ्याच कृषी सेवा केंद्र चालकांनी कंपनीचे सोयाबीन बियाणे विक्रीसाठी आणले नाही. त्यात यंदा बाजारात सोयाबीनचे दर साडेसात हजारांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले. त्यामुळे घरगुती बियाणे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध नाही. त्यातच शिरपूर व वसारी परिसरातील काही शेतकऱ्यांनी पेरणीची गडबड केली. शिरपूर व वसारी भागात ३ जूनपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या परिसरात १८ जूनपर्यंत ३१९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातच मंगळवारी शिरपूर येथे तब्बल १२२ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे मंगळवारी झालेल्या बहुतांश पेरण्या उलटल्या आणि शेतकऱ्यांचे बियाणे व खते वाया गेले. अगोदरच बियाणे व खताचा तुटवडा असताना मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. वसारी, पांगरी कुटे येथील शेतकरी मालेगाव शिरपूर येथील विविध कृषी सेवा केंद्रांवर सोयाबीन बियाणे व खतासाठी चकरा मारत आहेत. मात्र दुकानांवर सोयाबीन बियाणे आणि खत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत खत उपलब्ध होईल, असे काही कृषी सेवा केंद्रचालकांनी चौकशी करणाऱ्या शेतकऱ्यांना शुक्रवारी सांगितले.

---------

कोट: यंदा सोयाबिन बियाणाचा तुडवडा आहेच. आवश्यक त्या प्रमाणात बियाणे यावर्षी उपलब्ध होऊ शकले नाही. एप्रिल महिन्यापासून गावोगावी शिबिर घेऊन शेतकऱ्यांना घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यात मालेगाव येथील काही दुकानांवर खत उपलब्ध आहे. लवकरच अधिक प्रमाणात खत उपलब्ध होईल.

-सुभाष अवचार

-कृषी अधिकारी, पं.स. मालेगाव

Web Title: Farmers are facing difficulties due to shortage of seeds and fertilizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.