नुकसानीच्या पंचनाम्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:15+5:302021-07-25T04:34:15+5:30
बी, बियाण्याचे वाढलेले दर, कर्जासाठी बँकेकडून होणारा त्रास, कर्जाचा डोंगर, खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज या संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला ...
बी, बियाण्याचे वाढलेले दर, कर्जासाठी बँकेकडून होणारा त्रास, कर्जाचा डोंगर, खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज या संकटाने शेतकरी मेटाकुटीस आला असताना मुसळधार पावसाच्या संकटाने आता संतप्त झाला आहे. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने अनेक नदी, नाल्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टर जमीन खरडून गेली व पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. प्रशासनाकडून पंचनामे होऊन प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
.......
लवकरच पंचनामे होणार : पालकमंत्री देसाई
अतिवृष्टीने तालुक्यात झालेल्या नुकसानीची माहिती पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांना देण्यात आली असता पावसाचा जोर ओसरल्यावर लवकरच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास देऊन या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी दिली.