शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:17+5:302021-08-25T04:46:17+5:30
----- शिवमंदिर परिसरात शुकशुकाट वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश आहे. त्यामुळे भाविक मंदिरांकडे येत नसल्याने ...
-----
शिवमंदिर परिसरात शुकशुकाट
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश आहे. त्यामुळे भाविक मंदिरांकडे येत नसल्याने वाशिम तालुक्यातील शिवमंदिर परिसरात सकाळ व सायंकाळची वेळ सोडल्यास दिवसभर शुकशुकाट राहत आहे.
---------------
ग्रामस्थांची कोरोना चाचणी वेगात
वाशिम. : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने कोरोना चाचणीवर अधिक भर दिला असल्याने आता गावागावांत ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली जात आहे.
------------------
प्रशासनाच्या निर्बंधांचे कठोर पालन
वाशिम : राज्यात आढळत असलेले डेल्टा प्लसचे रुग्ण लक्षात घेता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लावण्यात आले. यात कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात निर्बंधांचे कठाेर पालन होेत असल्याचे २४ ऑगस्ट रोजी दिसून आले.
^^^^^^^^
अवैध दारू विक्रीवर छापे
वाशिम : ग्रामीण भागात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. त्यात गत आठवडाभरात विविध ठिकाणी छापे मारून कारवाई केली. अवैधरीत्या दारूविक्री करीत असल्याचे पोलिसांनी छापा टाकत दारू जप्त केली. अनसिंगसह वाशिम ग्रामीण पोलिसांनीही कारवाई केली.
---------------