पिकांवरील रोग नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांचे उद्बोधन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:06 PM2018-07-17T14:06:56+5:302018-07-17T14:07:56+5:30

वाशिम : किसान कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सोनखास येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात खरीप पिकांवरील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांचे उद्बोधन करण्यात आले. 

Farmers' awareness about disease control on crops! | पिकांवरील रोग नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांचे उद्बोधन!

पिकांवरील रोग नियंत्रणाविषयी शेतकऱ्यांचे उद्बोधन!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : किसान कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सोनखास येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात खरीप पिकांवरील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांचे उद्बोधन करण्यात आले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पोलीस पाटील सुनील उकंडा गोरे होते. मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र, करडाचे कीटकशास्त्रज्ञ आर.एस. डवरे व गृहविज्ञान शाखाप्रमुख शुभांगी वाटाणे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जयप्रकाश लव्हाळे यांनी केले. फळ झाड लागवड कार्यक्रम, नॅडेप युनिट तयार करणे, सेंद्रिय खत निर्मिती तसेच कृषी अवजार वाटप योजना, स्व. भाऊसाहेब फुंडकर फलोत्पादन योजना, खरीप पिक विमा याबाबत शेतकऱ्यांनी माहिती देण्यात आली. यासह खरीप हंगामातील पिकांवर उद्भवणारा कीड रोग व त्याच्या नियंत्रणासंबंधी उपस्थित झालेल्या प्रश्नांना डवरे यांनी उत्तरे दिली. कीटकनाशकांची हाताळणी व फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबतही शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले. शुभांगी वाटाणे यांनी फळ प्रक्रिया व कृषिमाल प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती कृषी पर्यवेक्षक निंबोळे यांनी दिली. यावेळी १०० लाभार्थींना ५०० फळझाडांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सोनखासचे कृषि सहाय्यक गजानन मार्गे यांनी केले.

Web Title: Farmers' awareness about disease control on crops!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.