शेतकऱ्यांनी मालेगाव तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:18 PM2018-03-06T16:18:05+5:302018-03-06T16:18:05+5:30
मालेगाव : बोंडअळीमुळे कपाशीला जबर फटका बसला असून, अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे संतप्त होत मालेगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी ५ मार्च रोजी तहसिल कार्यालय परिसरात कपाशीची झाडे जाळून निषेध नोंदविला तसेच नुकसानभरपाई तातडीने देण्याची मागणी तहसिलदारांमार्फत राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली.

गतवर्षी पावसाने सरासरी गाठली नव्हती. परिणामी, खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट आली होती. त्यानंतर बोंडअळीने कापूस उत्पादक शेतकºयांच्या नाकीनऊ आणले होते. बोंडअळीग्रस्त भागाचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई देण्याचे नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जाहिर केले होते. नुकसानभरपाईच्या निकषात आता काही बदल करण्यात आल्याने याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसणार आहे. ३० टक्के व त्यापेक्षा अधिक नुकसान असणाºया शेतकऱ्यांना नुकसाभरपाई मिळणार आहे. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी या भरपाईपासून वंचित राहणार आहेत. अशा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची नावे नुकसान भरपाईच्या यादीत समाविष्ठ करावी, या मागणीसाठी मालेगाव तालुक्यातील काही शेतकरी तहसिल कार्यालयावर ५ मार्चला धडकले. यावेळी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात कपाशीची काही झाडे जाळून शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यां ना १२ मार्चपर्यंत नुकसानभरपाई देण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यां नी दिला. यावेळी तहसिलदार राजेश वझिरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गजानन केंद्रे, भगवान बोरकर, गजानन बोरचाटे, अजय घुग,े पांडुरंग ठाकरेख राजू बोरचाटे, अशोक ठाकरे, वामन बोरचाटे, गजनन गव्हांदे, विजय भालेराव, अनिल जाधव, अश्विन भेंडेकर यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकऱ्यां ची उपस्थिती होती.