शेतकऱ्यांवर खते व बि -बियाणे खरेदीचे संकट
By Admin | Published: May 30, 2017 07:45 PM2017-05-30T19:45:33+5:302017-05-30T19:45:33+5:30
मानोरा : हवामान खात्याचे यंदाच्या खरीप हंगामात मान्सुन वेळेवर दाखल होणार असुन सरासरी एवढा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : हवामान खात्याचे यंदाच्या खरीप हंगामात मान्सुन वेळेवर दाखल होणार असुन सरासरी एवढा पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र बाजाराची स्थिती पाहता नोटाबंदीच्या परिणाम, कृषी मालाला, मिळालेला अत्यल्प भाव या बाबीचा आर्थिक परिणाम खरीप हंगामातील बियाणे, खत खरेदीवर होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक परिणाम खरीप हंगामातील बियाणे, खत खरेदीवर होणार असल्रूाचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक जुळवाजुळवीच्या चिंतेत सापडला आहे.