कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 06:07 PM2019-06-30T18:07:20+5:302019-06-30T18:07:49+5:30
समाधानकारक पाऊस झाल्यान खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : दिर्घ प्रतिक्षेनंतर मानोरा तालुक्यात २८ जून रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी नाल्यासह शेतजमिनी जलमय झाल्या. समाधानकारक पाऊस झाल्यान खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकºयांची कृषी सेवा केंद्रावर एकच गर्दी होत आहे.
यावर्षी मान्सून लांबल्याने शेतकºयांची चिंता वाढली. शेती मशागतीनंतर शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस होताच, बी, बियाणे, खते घेण्याकरिता शेतकºयांची कृषी सेवा केंद्रावर गर्दी पाहावयास होत आहे. मागील हंगामात कपाशीला समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकºयाचा कल कपाशीकडे दिसुन येत आहे. यासोबतच सोयाबीनलासुध्दा पसंती देण्यात येत आहे. पाऊस लांबल्याने मुग, उडदाच्या पेºयावर मोठा परिणाम झाल्याचे दिसुन येते.