शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे - जितेंद्र आव्हाड

By admin | Published: March 31, 2017 08:04 PM2017-03-31T20:04:25+5:302017-03-31T20:13:11+5:30

कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Farmers' debt should be waived - Jitendra Awhad | शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे - जितेंद्र आव्हाड

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे - जितेंद्र आव्हाड

Next

मंगरुळपीर येथे संघर्ष यात्रा

मंगरुळपीर : महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळणे अनिवार्य असून वाढलेली महागाई व मंत्रालयामध्ये शेतकऱ्याला झालेली मारहाण ही लज्जास्पद बाब आहे. कर्ज माफीची मागणी करणाऱ्या २९ आमदारांना निलंबित करुन सुडबुध्दीचे राजकारण करणाऱ्या राज्यसरकारच्या निषेध करीत आहो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी केले.
मंगरुळपीर येथील अकोला चौकात ३१ मार्च रोजी संघर्ष यात्रा आली असता आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार नितेश राणे, आ. नवाब मलीक, आ. यशोमती ठाकुर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मेघा वाघमारे, प्रतिभा महल्ले, चंदुभाऊ परळीकर, अशोक परळीकर, मिलींद पाकधने, जावेद सौदागर, उबेद मिर्झा, भाई देवराव फु के, अनंता काळे, आनंद राऊत, उमेश गावंडे, राजेंद्र पाटील, राजेंद्र मिसाळ, पुंडलीकराव ठाकरे, घनश्याम पवार, श्रीहरी इंगोले यासह राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी , हजारो शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers' debt should be waived - Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.