शेतकºयांचा पेरणीवर बहिष्काराचा निर्णय
By admin | Published: May 3, 2017 02:30 PM2017-05-03T14:30:22+5:302017-05-03T14:30:22+5:30
ढोरखेडा येथील शेतकºयांनी शेती बंदचा अर्थात पेरणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसभेचे आयोजन करून घोषित केला आहे.
शिरपूर जैन: वाढती महागाई व शेतमालास योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतमालास अपेक्षीत भावच न मिळाल्याने यंदाच्या खरीप हंगामात महागडी बि-बियाणे आणि खते खरेदी करावी की घराचा डोलारा सांभाळावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. याच कारणामुळे मालेगाव तालुक्याच्या ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी शेती बंदचा अर्थात पेरणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामसभेचे आयोजन करून घोषित केला आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांकडे विकण्यासाठी शेतमालच नसताना प्रत्येक वाणाचे दर गगनाला भिडले होते. यंदा मात्र कोणत्याच शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करून पिक काढणारा शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. अपेक्षीत भावाअभावी पिककर्जाची परतफेड करणे त्यांच्यासाठी कठीण झाल्यानेच ढोरखेडा येथील शेतकऱ्यांनी यंदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी गावात रितसर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या