भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित शेतकरी धडकले लघू पाटबंधारे कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:00 PM2018-09-14T18:00:11+5:302018-09-14T18:01:19+5:30

वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या जयपूर येथील बॅरेजसाठी जमिनी देणाºया सुमारे ११४ शेतकºयांना गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाचा अपेक्षित मोबदला मिळालेला नाही.

Farmers demand for compansation; rally on the minor irrigation office! | भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित शेतकरी धडकले लघू पाटबंधारे कार्यालयावर!

भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित शेतकरी धडकले लघू पाटबंधारे कार्यालयावर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या जयपूर येथील बॅरेजसाठी जमिनी देणाºया सुमारे ११४ शेतकºयांना गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाचा अपेक्षित मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संबंधित शेतकºयांनी शुक्रवार, १४ सप्टेंबर रोजी लघूसिंचन कार्यालयावर धडक देवून बुडित क्षेत्रात गेलेल्या जमिनींची नव्याने मोजणी करून तत्काळ मोबदला अदा करावा, अशी मागणी कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्याकडे लावून धरली. 
जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले आहेत. दरम्यान, पुरेसे पाणी मिळणार असल्याने शेतजमिनी बारमाही सिंचनाखाली येणार, अशी अपेक्षा ठेवून शेतकºयांनी स्वयंस्फूर्तीने या प्रकल्पांकरिता आपल्या शेतजमिनी संपादित करून दिल्या. मात्र, बॅरेज बांधकामापुर्वी संपादित करण्यात आलेल्या जमिनींपेक्षा अधिक जमिनी बॅरेजमध्ये पाणीसाठा झाल्यानंतर बुडित क्षेत्राखाली गेल्या आहेत. यामुळे २ वर्षांपासून पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यासंदर्भात अनेकवेळा लघूपाटबंधारे कार्यालयाकडे समस्या सुटण्यासंबंधी अर्ज दाखल केले. जानेवारी महिन्यात बेमुदत उपोषणही केले. मात्र, त्याचा अद्याप काहीच फायदा झाला नाही, अशी कैफियत शेतकºयांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे मांडली.
 
उत्पन्नावर परिणाम, शेतांमधील रस्ते झाले बंद!
जयपूर येथील शेतकºयांनी हरितक्रांतीचे स्वप्न उराशी बाळगून बॅरेजसाठी जमिनी दिल्या. मात्र, शेकडो एकर परिसरात पाणी साचून राहत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून सोयाबिन, तूर, हळद, उडीद, मूग, हरभरा, गहू, भाजीपाला, उन्हाळी भूईमुग, तीळ यापैकी कुठलेच पीक घेता आले नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे शेतात जाणारे रस्ते बुडित क्षेत्राखाली गेल्यामुळे शेतात ये-जा करण्याची वाट बंद झाली आहे. ही समस्या देखील निकाली काढण्याची मागणी यावेळी जयपूर येथील शेतकºयांनी केली. 

जयपूर येथील ११४ शेतकºयांपैकी ७५ शेतकºयांच्या जमिनीची पुर्नमोजणी केली असून हे क्षेत्र ३१.४३ हेक्टर एवढे आहे. यासंदर्भातील रितसर प्रक्रिया पूर्ण होताच संबंधितांना मोबदला अदा केला जाईल. 
- प्रशांत बोरसे
कार्यकारी अभियंता, लघूपाटबंधारे विभाग, वाशिम

Web Title: Farmers demand for compansation; rally on the minor irrigation office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.