सोनल प्रकल्पातील पाण्यापासून शेतकरी वंचित !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 04:00 PM2019-01-08T16:00:49+5:302019-01-08T16:01:42+5:30
शेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार (वाशिम) : सोनल प्रकल्पाच्या कालव्यातून रब्बी हंगामाकरिता पाणी मिळत नसल्याची तक्रार वनोजा येथील गणेश नामदेव गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी शेलूबाजार येथील सोनल प्रकल्प शाखा अभियंत्यांकडे ८ जानेवारीला केली. पाण्याअभावी गहू पिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकºयांनी वर्तविली आहे.
सन २०१८ मध्ये सोनल प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी झाली. यावर्षी गव्हाचा पेरा चांगलाच वाढलेला आहे. परंतु सोनल प्रकल्प प्रशासनाकडून प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था केली नसल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. वनोजा येथील शेतकरी गणेश नामदेव गावंडे यांनी शेलूबाजार शाखेत जावून गहू पेरणी करावयाची असल्याने सिंचनासाठी पाणी मिळेल का? अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांना पाणी मिळेल असे आश्वासन मिळाल्याने रितसर अर्ज केला. गावंडे यांचेकडून सन २०१६-१७ मधील थकीत १८३ रुपयांचा भरणा करुन पावती दिली. त्यामुळे पाणी मिळण्याची आशा पल्लवीत झाल्याने २ एकरात ९ डिसेंबर रोजी गव्हाची पेरणी केली. परंतु अद्याप शेतात पाणी पोहचले नाही. अशीच गत परिसरातील अनेक शेतकºयांची झाली आहे. पेरलेले बियाणे व्यर्थ जावू नये म्हणून विहीरीचे पाणी देवून पिके वाचविली. परंतु यापुढे विहिरीत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे प्रकल्पातील पाणी मिळविण्यासाठी शेलूबाजार शाखेत वारंवार चकरा मारल्या. परंतु उडवा उजवीचे उत्तरे मिळत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. तºहाळा येथील अनेक शेतकºयांनी रब्बीची पेरणी केली. परंतु अद्याप त्यांच्या शेतात पाणी पोहोचले नसल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात सोनल प्रकल्पाचे प्रभारी शाखा अभियंता अनिल डांगे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांनी कॉल रिसीव्ह केला नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.