मानोरा तालुक्यात शेतक-यांचा विरोध झुगारून कृषीपंपाची वीजजोडणी तोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 11:27 PM2017-12-06T23:27:04+5:302017-12-06T23:32:00+5:30

मानोरा तालुक्यातील अडाण प्रकल्पावरील इंझोरी परिसरातील कृषीपंपाच्या जोडण्या खंडित करण्यासाठी आलेल्या तहसिलच्या पथकाला शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकºयांचा विरोध झुगारून या पथकाने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला. 

Farmer's electricity connection broke out after resisting the farmers of Manora taluka! | मानोरा तालुक्यात शेतक-यांचा विरोध झुगारून कृषीपंपाची वीजजोडणी तोडली!

मानोरा तालुक्यात शेतक-यांचा विरोध झुगारून कृषीपंपाची वीजजोडणी तोडली!

Next
ठळक मुद्देइंझोरी परिसरातील शेतकरी आक्रमक तहसिलदारांचे वाहन अडविले

लोकमत न्यूज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातीलअडाण प्रकल्पावरील इंझोरी परिसरातील कृषीपंपाच्या जोडण्या खंडित करण्यासाठी आलेल्या तहसिलच्या पथकाला शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतक-यांचा विरोध झुगारून या पथकाने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला. 
यंदा अपुरा पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर प्रकल्पांतील संपूर्ण पाणी आरक्षीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत; परंतु हे आदेश जारी होण्यापूर्वी शेकडो शेतक-यांनी रब्बीची पेरणी उरकली आणि प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर त्या पिकांना पाणी देणेही सुरू केले. दरम्यान, सद्या रब्बी हंगाम अर्ध्यावर आला असताना प्रशासनाने पाणी उपसा बंद करण्याचा पवित्रा घेतल्याने पिके सुकून शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे पाणी उपसा बंद करण्याच्या भूमिकेला शेतकºयांनी विरोध दर्शविला आहे.  यापूर्वीही २ डिसेंबर रोजी मानोराचे नायब तहसीलदार भोसले हे अडाण प्रकल्पावरील कृषीपंपाच्या जोडण्या खंडित करण्यासाठी आले असता शंभरापेक्षा अधिक शेतकºयांनी त्यांना मज्जाव केला होता. त्यावेळी कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला नव्हता. ६ डिसेंबर रोजी पुन्हा तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण व नायब तहसिलदार भोसले हे पथकासह आले असता, शेतकºयांनी या प्रकाराला विरोध केला. मात्र तहसिलदारांनी शेतकºयांचे काहीही म्हणने ऐकून न घेता विद्युत पुरवठा खंडीत केला.  या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी तहसिलदारांचे वाहनासमोर रस्त्यावर बसून विरोध दर्शविला. तहसिलदारांचे वाहन सुमारे एक तास अडविण्यात आले. वीजजोडणी तोडण्यापूर्वी किमान सूचना देणे अपेक्षीत होते, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली. धरणामध्ये राखीव पाणी ठेवूनही जास्त साठा आहे. या अतिरिक्त साठ्यातून सिंचनासाठी पाणी द्या, अशी आर्त हाक शेतकºयांनी दिली. शेतात पेरलेले पीक घेण्यासाठी आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी चालेल अशी भूमिका घेत शेतकरी वीजजोडणी न तोडण्याच्या निर्णयावर ठाम होते.  तोडलेली विजजोडणी पुुन्हा जोडण्याकरिता या शेतकºयांनी आक्रमक होत तहसिलदारांच्या वाहनासमोर ठिय्या दिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसिलदारांनी मानोरा येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविली. तरीही शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेतक-यांची आंदोलन चिघळण्याची चिन्हे दिसताच, माजी पंचायत समिती सदस्य धनराज दिघडे व अन्य काही जणांनी मध्यस्थी करीत शेतक-यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतक-यांनी तुर्तास माघार घेत तहसिलदारांच्या वाहनाला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, पिके वाचविण्यासाठी मानोरा येथे कुटुंबियासह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा उपस्थित शेतकºयांनी दिला.
 

Web Title: Farmer's electricity connection broke out after resisting the farmers of Manora taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.