हरभऱ्याच्या पेरणीवर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 03:43 PM2018-10-21T15:43:11+5:302018-10-21T15:43:46+5:30
पश्चिम वºहाडातील शेतकरी हरभरा पिकाच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ऐन रब्बीच्या हंगामात महावितरणने वारेमाप भारनियमन सुरु केले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण होणार आहे. अशात अधिक पाण्याची गरज असलेल्या गहू पिकाची पेरणी करणे धोक्याचे ठरू शकणार आहे. त्यामुळे पश्चिम वºहाडातील शेतकरी हरभरा पिकाच्या पेरणीवर भर देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यंदाच्या रब्बी हंगामासाठी पश्चिम वºहाडातील शेतकºयांकडे प्रामुख्याने अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांकडे पुरेशा पाण्याची सुविधा आहे. त्यामुळे शेतकºयांत रब्बी हंगामाविषयी अपेक्षा वाढल्या होत्या; परंतु महावितरणने या हंगामाच्या सुरुवातीलाच भारनियमन सुरू केले आहे. त्यामुळे पाणी असतानाही सिंचन करण्यात अडचणी येणार आहेत. रब्बी हंगामातील गहू पीक दीर्घकालीन आणि पाण्याची अधिक आवश्यकता असणारे आहे, तसेच पश्चिम वºहाडातील जमिनीचा स्तर पाहता या पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचीही गरज असते. त्यामुळे शेतकरी या पिकाच्या पेरणीची जोखीम उचलण्यास तयार नाहीत. त्यामुळेच कमी पाण्याची आवश्यकता असलेल्या हरभरा पिकाच्या पेरणीवर शेतकरी भर देत आहेत.
घरच्या बियाण्यांचा वापर अधिक
कृषी विभागाने रब्बीच्या हंगामाची तयारी करताना अनुदानित बियाणे आणि खते शेतकºयांसाठी उपलब्ध केली आहेत; परंतु अनुदानित बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागला. हरभरा पेरणीची उत्तम वेळ निघून जात असल्याने, तसेच अनुदानित हरभरा बियाण्याचे दर हे खुल्या बाजारातील बियाण्यांच्या तुलनेत अधिक असल्याने शेतकरी घरच्या बियाण्यांचाच वापर अधिक करीत आहेत.
गहू पिकाला किमान ८ ते १० वेळा पाणी देणे आवश्यक असते. आता महावितरणच्या भारनियमनामुळे या पिकाला पुरेसे पाणी मिळू शकणार नसल्याने हरभरा पिकाची पेरणी केली आहे.
-दशरथ पवार, शेतकरी, मंगरुळपीर (वाशिम)