सोयाबीन पिकाच्या फवारणीत शेतकरी व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:46 AM2021-07-14T04:46:56+5:302021-07-14T04:46:56+5:30

मागील महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बासंबा व परिसरातील बळीराजाने तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिकांबरोबर सोयाबीनची पेरणी केली. मध्यंतरी ...

Farmers engaged in spraying of soybean crop | सोयाबीन पिकाच्या फवारणीत शेतकरी व्यस्त

सोयाबीन पिकाच्या फवारणीत शेतकरी व्यस्त

Next

मागील महिन्यात चांगला पाऊस झाल्याने बासंबा व परिसरातील बळीराजाने तूर, उडीद, मूग, कापूस आदी पिकांबरोबर सोयाबीनची पेरणी केली. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यानंतर अनेक दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीने सोयाबीन पिकावर अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने व पिकांमध्ये कोळपणी करूनही तणांची वाढ होत असल्याने अनेक शेतकरीवर्ग सध्या सोयाबीन पिकात तणनाशकका बरोबर कीटकनाशकाचे फवारणी करताना दिसून येत आहेत. दिवसेंदिवस वाढलेल्या डिझेलच्या व पेट्रोलच्या किमतीमुळे शेतकऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे महागडे पडत आहे. या वर्षी इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांनी आपल्या शेतातील अवजाराचे भाव वाढवले असले तरी मजूर टंचाई व दिवसेंदिवस मजुरांच्या वाढत्या भावामुळे शेतकरीवर्ग यांत्रिक शेतीकडे वळला असेल. उत्पादनाच्या मानाने दिवसेंदिवस खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पादनाच्या मानाने बाजारभाव मिळाल्याशिवाय शेती फायद्यात येणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून येताना दिसून येत आहे. तसेच इंधन दरवाढीचा फटका सर्वात जास्त शेतकरीवर्गाला बसला असून इंधन दरवाढीमुळे खते व बी-बियाणे तसेच कीटकनाशकांच्या किमतीतसुद्धा विक्रमी वाढ झाली असून बाजारात सध्या सोयाबीन पिकाव्यतिरिक्त इतर पिकांना अजूनही पुरेसा भाव मिळत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यातच असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी शेतकरीवर्ग मात्र खरिपातील शेतीच्या कामात सध्या व्यस्त झाले आहेत.

Web Title: Farmers engaged in spraying of soybean crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.