कारंज्यातील शेतकरी धडकले उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:42 PM2017-11-30T18:42:46+5:302017-11-30T18:45:08+5:30

कारंजा तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. 

Farmers of the Falgun are on the office of sub-divisional officers! | कारंज्यातील शेतकरी धडकले उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयावर!

कारंज्यातील शेतकरी धडकले उपविभागीय अधिका-यांच्या कार्यालयावर!

googlenewsNext
ठळक मुद्देकुपटी ते  कारंजा १६ कि.मी. पायदळवारी विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा तालुक्यात गत ४ वर्षांपासून नैसर्गिक आणि शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी, शेतमजुर आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्या मान्य व्हाव्या, याकरिता कारंजा तालुक्यातील कुपटी येथून १६ किलोमिटर पायदळ मोर्चा काढत शेकडो शेतकरी, शेतमजूर ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. 
११ नोव्हेंबर २०१७ रोजी कारंजा तालुक्यातील कुपटी येथील स्व. सुलभाताई इंगोले कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीला शिकणारा २२ वर्षीय विद्यार्थी मंगेश विष्णू लव्हाळे याने आपल्या वडिलाकडे असलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून विहिरीत उडी घेउुन आत्महत्या केली होती. त्या विद्यार्थ्याची  आत्महत्या ही आत्महत्या नव्हे तर बलिदान ठरावे या करिता कुपटी येथील राहत्या घरापासून कारंजापर्यंत शेतकरी नेते तथा जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर व जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई गणेशपुरे यांच्या नेतृत्वात पायदळ यात्रा काढण्यात आली. या पायदळ यात्रेत शेतकरी व शेतमजुरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
तसेच माजी आमदार प्रकाश डहाके यांच्यासह जिल्हा मध्यावर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, ख.वि.स.चे अध्यक्ष बाबाराव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकरी व शेतमजुरांचा एल्गार मोर्चा कारंजा उपविभागीय अधीकारी यांच्या कार्यालयावर धडकला. सलग २ वर्षाच्या दुष्काळानंतर गतवर्षी परतीचा पाऊस व त्याच बरोबर नोटबंदीमुळे शेतकºयांना जबर फटका बसला. तूर पिकाचे अभूतपुर्व उत्पादन होवूनही शेतक-यांच्या नशिबी हालअपेष्टा व आर्थिक नुकसानीशिवाय काहीच आले नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतू त्याचा किती शेतक-यांना लाभ मिळाला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा परिणाम आहे असा आरोप करीत आता तर शेतक-यांची शेतकरी मुलं व तरूण मुली आत्महत्या करीत आहेत, असा दावाही मोर्चेकºयांनी केला.आपल्या वेदना सरकारसमोर सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी मोर्चा काढला. एल्गार मोर्चा तहसिल परिसरात आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहिर सभेत झाले. मान्यवरांनी उपस्थित शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन केले. 
 

Web Title: Farmers of the Falgun are on the office of sub-divisional officers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.