गुरांच्या चाऱ्यासाठी चारापिकांवर शेतकऱ्यांचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:18+5:302021-07-28T04:43:18+5:30
जिल्ह्यात तृणधान्याच्या पेरणीचे क्षेत्र घटले आहे, तर कुरण क्षेत्रातही मोठी घट झाली. त्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. ...
जिल्ह्यात तृणधान्याच्या पेरणीचे क्षेत्र घटले आहे, तर कुरण क्षेत्रातही मोठी घट झाली. त्यामुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. यावर पर्याय म्हणून शेतकरी आता शेतजमिनीतच चारा लागवडीसाठी राखीव क्षेत्र सोडून विविध प्रकारच्या चारा पिकांची लागवड करीत आहेत. त्यात नेपिअर या गवताच्या लागवडीचे प्रमाण वाढत आहे. यासाठी कृषी विज्ञा केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून, जनावरांच्या आहारात हिरव्या चाऱ्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. शिवाय लागवड तंत्रज्ञान, कापणी, गवताचे आहारातील प्रमाण व पद्धत याविषयी सखोल माहिती पशुपालक शेतकऱ्यांना देऊन दूध व्यवसायात वाढ होण्याच्या दृष्टीने नेपिअर गवत कसे फायदेशीर आहे, ते पटवून देण्यात येत आहे.
-----------
शेतकऱ्यांना गवताच्या थोंबाचे वाटप
गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांनी नेपिअर गवत किंवा इतर चारा पिकांची लागवड करावी म्हणून त्यांना मार्गदर्शन करतानाच कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना गवताच्या थोंबाचे मोफत वितरण केले जात आहे. काही दिवसांपूर्वी वाशिम तालुक्यातील कळंबा महाली व पार्डी टकमोर या गावातील पशुपालक शेतकऱ्यांना गवताचे थोंब वाटप करण्यात आले.