शेतरस्त्यासाठी जऊळकाच्या शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 05:02 PM2018-06-22T17:02:43+5:302018-06-22T17:02:43+5:30

मालेगाव: शेताच्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याने जऊळका रेल्वे परिसरातील अल्पभूधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी त्यांनी के ली असून, त्याची दखल न घेतल्यास सर्व शेतकरी २ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी मालेगावच्या तहसीलदारांना दिला आहे.

the farmers gave memorandum to tehsildar |  शेतरस्त्यासाठी जऊळकाच्या शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

 शेतरस्त्यासाठी जऊळकाच्या शेतकऱ्यांची तहसीलवर धडक

Next
ठळक मुद्दे या संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी शेकडो शेतकरी २२ जून रोजी मालेगाव तहसीलवर धडकले होते. खरीपाचा हंगाम सुरू झाल्यानंतर पेरणीसह इतर कामांसाठी शेतात जावे लागत असताना रस्ता बंद केल्याने शेतकºयांची अडचण झाली आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: शेताच्या वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्याने जऊळका रेल्वे परिसरातील अल्पभूधारक शेतकरी अडचणीत आले आहेत. हा रस्ता मोकळा करण्याची मागणी त्यांनी के ली असून, त्याची दखल न घेतल्यास सर्व शेतकरी २ जुलैपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी मालेगावच्या तहसीलदारांना दिला आहे. या संदर्भात निवेदन सादर करण्यासाठी शेकडो शेतकरी २२ जून रोजी मालेगाव तहसीलवर धडकले होते. 
मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील अल्पभूधारक शेतकºयांची शेती परिसरातील पिंपळमाथ्यावर आहे. हे शेतकरी पिढ्यानपिढ्या फकिरमाध्यावरील वहिवाटीच्या रस्त्याने शेतात येजा करतात, तसेच बैलगाडीने शेतमालासह विविध साहित्याच नेआण करीत असतात. मात्र हा रस्ता ज्या शेताजवळून जातो. त्या शेताचे मालक ओमप्रकाश मालपाणी यांनी शेतकºयांना या रस्त्यावरून वहिवाट करण्यास मज्जाव केला आहे. आता  त्यांचे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन शेतीच असून, खरीपाचा हंगाम सुरू झाल्यानंतर पेरणीसह इतर कामांसाठी शेतात जावे लागत असताना रस्ता बंद केल्याने शेतकºयांची अडचण झाली आहे. हा शेतरस्ता वहिवाटीसाठी मोकळा करून देण्याची मागणी शेतकºयांन केली असून, त्याची दखल न घेतल्यास २ जुलैपासून मालेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा त्यांनी मालेगावचे तहसीलदार राजेश वजिरे यांना २२ जून रोजी निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी उकंडा महादू वसू, विश्वनाथ भांदुर्गे, आत्माराम ढवळे, उदेभान नगरे, प्रकाश सावळे, कैलास ढवळे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थिती होते. दरम्यान, मालेगावच्या तहसीलदारांनी तातडीने संबंधित तलाठ्यांना बोलावून या शेतकºयांच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या सुचना दिल्या.


 संबंधित वहिवाटीचा रस्ता नकाशावर नसल्याचरी माहिती शेतकºयांना दिली आहे. तथापि, त्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सामंजस्याने मार्ग काढण्याचे प्रयत्न करण्यात येतील. 
-राजेश वजिरे, तहसीलदार मालेगाव

Web Title: the farmers gave memorandum to tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.