शासकीय तूर खरेदीत शेतकऱ्यांची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 01:39 PM2020-01-22T13:39:25+5:302020-01-22T13:39:35+5:30
वाशिम जिल्ह्यासह ईतरही जिल्ह्यातील लाखो शेतकºयांना शासकीय खरेदीचा लाभ नावालाच मिळणार असून, मोठ्या प्रमाणातील तूर बाजारात अल्प दराने विकावी लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात ६० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी झाली असताना नाफेडच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या सातबारावर गुंठ्याच्या प्रमाणात तुरीच्या क्षेत्राची नोंदणी करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे वाशिम जिल्ह्यासह ईतरही जिल्ह्यातील लाखो शेतकºयांना शासकीय खरेदीचा लाभ नावालाच मिळणार असून, मोठ्या प्रमाणातील तूर बाजारात अल्प दराने विकावी लागणार आहे.
राज्यात येत्या २ फेब्रुवारीपासून शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावाने तूर खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. तथापि, ही नोंदणी करताना शेतकºयांच्या सातबारावर प्रत्यक्ष पीकपेºयात नमूद केलेल्या क्षेत्रानुसारच नोंदणी करण्याच्या सुचना जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी खरेदी-विक्री संस्था, तसेच शासकीय खरेदीची जबाबदारी घेतलेल्या संस्थाना गोन दिवसांपूर्वी दिल्या आहेत. त्यात तलाठ्यांना तुरीचे क्षेत्र नमूद करताना आंतरपीक असलेल्या पिकांचे सामाईक क्षेत्र नमूद करण्याऐवजी प्रत्यक्ष पेरणीचे क्षेत्र नमूद करायला सांगितले आहे. त्यामुळे तूर खरेदीसाठी नोंदणी करताना संबंधित संस्थांना सातबारावरील क्षेत्र आणि सरासरी ऊत्पादकता विचारात घेऊन नोंदणी करावी लागणार आहे. अशात शेतकºयांना झालेल्या प्रत्यक्ष ऊत्पादनापेक्षा खूप कमी प्रमाणात हमीभावाने तूर विक्री करावी लागेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकवलेली तूर बाजारात कवडीमोल दराने विकण्याची पाळी शेतकºयांवर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या जाचक अटीमुळे शासकीय खरेदी करणाºया संस्थाही अडचणीत येणार असल्याने त्यांनीही सदर अट रद्द करण्याची मागणी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांकडे केली आहे.
जिल्ह्यात केवळ २०० शेतकºयांची नोंदणी
शासकीय केंद्रांवर तूर खरेदीसाठी जिल्ह्यात नोंदणी सुरू झाली असली तरी मागील पाच दिवसांत केवळ २१६ शेतर्कयांची च नोंदणी होऊ शकली आहे. त्यात मंगरूळपीर येथील केंद्रावर सर्वाधिक २६० शेतर्कयांची, कारंजा येथे ४१ शेतर्कयांची, तर मालेगाव येथे केवळ १६ शेतर्कयांची नोंदणी झाली आहे. वाशिम आणि रिसोड येथे अद्याप एकाही शेतकºयांची नोंदणी झाली नाही. त्यात वाशिम तालुक्यातील दोन हजार शेतर्कयांनी यासाठी अर्ज केले असले तरी जाचक अटीमुळे या केंद्रावर नोंदणी करण्यात आली नाही.
शेतकºयांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन
शासकीय खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी सातबारावरीव पीक पेºयानुसार नोंदणी करण्याचे निर्देश असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. प्रत्यक्ष शेतकºयांना एकरी ५ क्विंटलपेक्षा अधिक तुरीचे ऊत्पन्न यंदाझाले असून, जिल्ह्यात ६० हजार हेक्टर हून अधिक क्षेत्रात तूर पेरणी झाली नाही होती. त्यामुळे जिल्ह्यात शासकीय केंद्रावर सातबारावरील नमूद क्षेत्र विचारात न घेता सोयाबीनच्या पेरणीप्रमाणेच एकरी पद्धतीने तुरीची नोंदणी करण्याची मागणी वाशिम तालुक्यातील नथ्थूजी कापसे यांच्यासह ११ शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात शासरीय खरेदी केंद्रावर तुरीची नोंदणी सातबारावरील पेरेपत्रकानुसार करण्यात येत असल्याने शेतकºयांचे मुकसान होणार असल्याचे निवेदन आपल्याकडे शेतकºयांनी दिले आहे. प्रत्यक्ष यंदा तुरीचे ऊत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे नोंदणीची अट रद्द करण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, वाशिम