शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर तूर संगोपनावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 17:26 IST2018-11-26T17:25:21+5:302018-11-26T17:26:13+5:30
शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या संगोपनाकडेच शेतकºयांनी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर तूर संगोपनावर!
वाशिम : सिंचनासाठी पुरेसे पाणी आणि अखंडीत वीज या दोन्ही सुविधा मिळणे दुरापास्त झाल्याने यंदाच्या रब्बी हंगामात गहू, हरभºयाच्या पेºयात बहुतांशी घट झाली आहे. त्याऐवजी शेतात उभ्या असलेल्या तुरीच्या संगोपनाकडेच शेतकºयांनी अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षीच्या रब्बी हंगामात अमरावती विभागातील वाशिम, अकोला, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये ६ लाखांपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावर गहू, हरभरा यासह अन्य पिकांच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून केले जाते. त्यानुसार, यंदाही नियोजन करण्यात आले; परंतु पेरणीची वेळ उलटून गेल्यानंतरही २६ नोव्हेंबरपर्यंत अधिकांश शेतकºयांनी अद्याप पेरणीच केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, महावितरणकडून कुठलेही ठोस वेळापत्रक तयार न करता कृषीपंपांना अवेळी केला जाणारा वीज पुरवठा, शेतशिवारांमध्ये संरक्षित ओलीताची सोय नसणे, सिंचन प्रकल्पांच्या नादुरूस्त कालव्यांमधून पिकांसाठी पाणी न मिळणे यासह रानडुक्कर, हरीण, रोही आदी वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान आदी बिकट समस्यांमुळे बहुतांश शेतकºयांनी गहू आणि हरभरा या पिकांच्या पेरणीकडे पाठ फिरवून केवळ तूर संगोपनाकडेच लक्ष केंद्रीत केल्याचे पाहावयास मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारणत: ९२ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले जाते. त्यापैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. शेतात तूर उभी असल्यानेच अनेक शेतकºयांनी पेरणी केलेली नाही.
- दत्तात्रय गावसाने
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम