शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याच्या विरोधात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:43 AM2021-04-02T04:43:46+5:302021-04-02T04:43:46+5:30
उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याची हद्द साडेपाच मीटर एवढी असल्याचा शासकीय पुरावा उपलब्ध असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ...
उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रस्त्याची हद्द साडेपाच मीटर एवढी असल्याचा शासकीय पुरावा उपलब्ध असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कंत्राटदार कंपनीला हाताशी धरून बेकायदेशीरपणे कुठलाही पुरावा नसताना आमच्या लाखमोलाच्या आणि येणाऱ्या पिढीच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जमिनीतील पंचवीस मीटर जागेवर राष्ट्रीय महामार्ग बांधून या शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, महत्त्वाकांक्षी असलेल्या महामार्गाला आमचा अजिबात विरोध नाही; परंतु त्यांच्या व त्यांच्या भावी पिढीच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या शेतजमिनीतून विनामोबदला निर्माण करण्यात येणाऱ्या बांधकामास लोकशाही मार्गाने हे उपोषण सुरू केल्याचे त्यांनी म्हटले आहे. निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या या उपोषण स्थळाला रा. मा.चे उपविभागीय अभियंता पनपालिया यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यां सोबत चर्चा केली. पनपालिया यांनी कुठलेही पुरावे सादर न करताच कंत्राटदार प्रकल्प व्यवस्थापक देवराज आप्पा एचके यांना अगोदर दिग्रसकडून मानोरा जाताना डावीकडील रस्ता बांधण्याचे निर्देश दिले आणि नंतर उपोषणकर्त्यांच्या हद्दीतील रस्त्याचे बांधकाम सोडून देण्याबाबत अंतिम तोंडी निर्देश कंत्राटदाराला दिले आहे; परंतु अतिक्रमणे हटविण्याबाबत कुठलाही शब्द पनपालिया यांनी यावेळी उपोषणस्थळी उच्चारला नाही.
कोट: जर रस्ता सोडून द्यायची राष्ट्रीय महामार्गाची तयारी असेल तर आमच्या शेतजमिनीवर केलेले अतिक्रमणही तत्काळ काढण्याची कार्यवाही होणे गरजेचे आहे.
ध्रुव राठोड उपोषणकर्ता शेतकरी, वाईगौळ, मानोरा